13 एप्रिलनंतर कर्नाटकात नवा मुख्यमंत्री, भाजप आमदाराचा बॉम्बगोळा; येडियुरप्पा टेन्शनमध्ये

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. ('Karnataka To Get New CM After April 13' Claims BJP MLA)

13 एप्रिलनंतर कर्नाटकात नवा मुख्यमंत्री, भाजप आमदाराचा बॉम्बगोळा; येडियुरप्पा टेन्शनमध्ये

बेंगळुरू: कर्नाटकात मुख्यमंत्री बदलणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. ही चर्चा काँग्रेस किंवा जनता दला (एस)कडून होत नाहीये. तर खुद्द भाजपच्याच एका ज्येष्ठ आमदाराने याबाबतचा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. (‘Karnataka To Get New CM After April 13’ Claims BJP MLA)

भाजपचे ज्येष्ठ आमदार बासनगौडा पाटील यतनाल यांनी राज्यात नेतृत्वबदल होणार असल्याचा दावा केला आहे. विजयपुरा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला. येत्या 13 एप्रिल रोजी नवा मुख्यमंत्री कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेईल, असं बासगौडा पाटील यांनी सांगितलं. उगादीच्या दिवशी राज्यात नवीन वर्ष साजरं केलं जातं. त्यानिमित्ताने राज्याच्या उत्तरेकडील भागातील नेताच कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होईल, असंही त्यांनी सांगितलं.

उत्तर कर्नाटकातील नेता होणार मुख्यमंत्री

बासनगौडा पाटील हे माजी केंद्रीय मंत्रीही आहेत. ते येडियुरप्पा यांचे टीकाकार म्हणून ओळखले जातात. येडियुरप्पा दीर्घकाळ मुख्यमंत्री राहणार नाहीत, असं त्यांनी ऑक्टोबरमध्ये सांगितलं होतं. येडियुरप्पा यांचे उत्तराधिकारी उत्तर कर्नाटक क्षेत्रातून असेल असं बासनगौडा यांनी सांगितलं. मला मुख्यमंत्रीपदासाठी हात पसरावे लागणार नाही. आमचा मुख्यमंत्री येईल. तोच मला मंत्रिपद देईल. थोडावेळ थांबा. प्रतिक्षा करा, असंही त्यांनी सांगितलं.

भाजपमध्ये अलबेल नाही?

बासनगौडा पाटील यांच्या या विधानावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजपने काँग्रसे-जनता दला (एस)कडून सत्ता खेचून आणली असली तरी भाजपमध्येही काहीच अलबेल नसल्याचं या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. बासनगौडा पाटील हे येडियुरप्पा यांच्यावर नाराज असल्याचं दिसून येत असून काँग्रेसही या नाराजीचा फायदा उचलण्यासाठी सक्रिय झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आगामी काळात कर्नाटकच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसणार आहेत. (‘Karnataka To Get New CM After April 13’ Claims BJP MLA)

संबंधित बातम्या:

Union Budget 2021 Marathi LIVE : आजच्या बजेटमध्ये आत्मनिर्भरतेचं दर्शन:पंतप्रधान नरेंद्र मोदी

Alcolhol Budget 2021: बजेटमधील घोषणांमुळे दारुच्या किंमतीवर काय परिणाम होणार?

एनडीए सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प प्रत्यक्षात पूंजीपती निर्भर भारत, अमोल कोल्हे यांची टीका

(‘Karnataka To Get New CM After April 13’ Claims BJP MLA)

Published On - 3:54 pm, Mon, 1 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI