AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explainer : तब्बल 36 वर्षांनी उघडली फाईल, काश्मिरी पंडित सरला भट्ट हत्या प्रकरण आहे तरी काय? वाचा A टू Z माहिती!

सरला भट्ट प्रकरणाची फाईल आता 36 वर्षांनी पुन्हा उघडली आहे. 2025 साली जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या राज्य तपास संस्थेने या प्रकरणी पुन्हा तपास केला. भट्ट यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न चालू करण्यात आले.

Explainer : तब्बल 36 वर्षांनी उघडली फाईल, काश्मिरी पंडित सरला भट्ट हत्या प्रकरण आहे तरी काय? वाचा A टू Z माहिती!
kashmiri pandit sarla bhatt murder caseImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 04, 2026 | 9:26 PM
Share

Who Is Sarla Bhat : जम्मू-काश्मीरला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हटलं जातं. सगळीकडे बर्फ असलेला हा प्रदेश खूपच सुंदर आणि पाहण्यासारखा आहे. परंतु याच भागाला दहशतवादाचा मोठा शाप मिळालेला आहे. कधीकाळी काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी संघटना सक्रीय होत्या. वेगळा काश्मीर हवा म्हणून या संघटनांकडून तिथे भयानक स्वरुपाची हिंसा केली जायची. काश्मीरध्ये राहणारे काश्मिरी पंडीतही या दहशतीचा बळी ठरले. दरम्यान, आता अशाच एका काश्मिरी पंडित कुटुंबातील नर्स सरला भट्ट यांचे हत्या प्रकरण आता 36 वर्षानंतर देशभरात चर्चेत आले आहे. या हत्या प्रकरणात पोल जम्मू काश्मीरमधील राज्य तपास यंत्रणेने (SIA) आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे सरला भट्ट हत्या प्रकरण नेमके काय आहे? हे प्रकरण आताच चर्चेत का आले? सरला भट्ट यांची हत्या का आणि कशी झाली होती? ते जाणून घेऊ या..

737 पानांचे आरोपपत्र दाखल

काश्मिरी पंडीत असलेल्या नर्स सरला भट्ट यांची हत्या करण्यात आली होती. त्यांचे अपहरण करून त्यांच्यावर अन्वनित अत्याचार करण्यात आले होते. अत्याचार करून नंतर त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आता काश्मीरमधील राज्य तपास यंत्रणेने (SIA) साधारण 36 वर्षांनी 737 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. एका श्रीनगरच्या विशेष न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. दाखल आरोपपत्रात अब्दुल हामिद शेख, मोहम्मद युसुफ सुफी, गुलाम मोहम्मद टपलू यांचे नाव घेण्यात आले आहे. हे तिघेही आता हयात नाहीत. त्यांचा मृत्यू झालेला आहे.

सरला भट्ट कोण होत्या, त्यांची हत्या कशी झाली होती?

सरला भट्ट तेव्हा अनंतनाग येथील काजीबागमध्ये वास्तव्यास होत्या. त्यांची हत्या झाली तेव्हा त्या फक्त 27 वर्षांच्या होत्या. त्या श्रीनगर येथील शेर ए काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये नर्स म्हणून नोकरीवर होत्या. त्यांनी नोकरी सोडावी म्हणून दहशतवाद्यांकडून त्यांना अनेकवेळा धमक्या आल्या. काश्मीर सोडून जा असेही त्यांना सांगण्यात येत होते. परंतु दहशतवाद्यांच्या या धमक्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केले. त्याचीच मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. दहशतवाद्यांनी त्यांचे 14 एप्रिल 1990 रोजी अपहरण केले.

19 एप्रिल 1990 रोजी आढलला मृतदेह

अपहरण झाले तेव्हा त्या शेर ए काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या हब्बा खातून नावाच्या वसतिगृहात राहायच्या. याच वसतीगृहातून त्यांचे अपहण झाली. त्यानंतर श्रीनगरमध्ये 19 एप्रिल 1990 रोजी त्यांचा मृतदेह आढळून आला. हत्येआधी त्यांच्यावर अन्वनित अत्याचार करण्यात आले होते.

सरला भट्ट यांच्या कुटुंबालाही धमक्या

काश्मीरमध्ये त्या काळात दहशतवाद चांगलाच फोफावला होता. त्याच काळात काश्मीरमध्ये बंदी असलेल्या काश्मीर लिबरेशन फ्रंट या दहशतवादी संघटनेने त्यांचे अपहरण केले होते. त्या काळात काश्मीरमधील पंडितांना लक्ष्य केले जायचे. काश्मीर घाटी सोडू जावे यासाठी तेव्हा काश्मिरी पंडितांवर अत्याचार करण्यात आले होते. सरला भट्ट यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमातही सहभागी होऊ नये अशा धमक्या तेव्हा भट्ट यांच्या कुटुंबाला देण्यात आल्या होत्या. या प्रकरणात तेव्हा निगीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एफआयआर संख्या 56/1990 अंतर्गत हे प्रकरण दाखल करून घेण्यात आले होते. परंतु त्यात नंतर काहीच तपास झाला नाही.

आता 36 वर्षानंतर पुन्हा फाईल उघडली

सरला भट्ट प्रकरणाची फाईल आता 36 वर्षांनी पुन्हा उघडली आहे. 2025 साली जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या राज्य तपास संस्थेने या प्रकरणी पुन्हा तपास केला. भट्ट यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न चालू करण्यात आले. भट्ट यांची हत्या झाल्यानंतर त्यांचा मृतदेह श्रीनगरमध्ये टाकून देण्यात आला होता. त्यांच्या मृतदेहा जवळ एका कागदावर काही मजकूर लिहण्यात आला होता. हे प्रकरण तेव्हा चांगलेच गाजले. परिणामी भविष्यात अनेक काश्मिरी पंडितांनी तेथून पलायन केले.

प्रकरण नव्याने कसे समोर आले?

काश्मीरमधून पलायन केलेले अनेक काश्मिरी पंडीत आता दिल्ली, जम्मू तसेच इतर भागात वास्तव्यास आहेत. 19 एप्रिल 1990 रोजी सरला भट्ट यांची हत्या झाली तेव्हा त्या घटनेला फारसे महत्त्व देण्यात आले नव्हते. तेथील एका स्थानिक वृत्तपत्राने एका ओळीची साधी बातमी दिली होती. आता हे प्रकरण नव्याने उघडण्यात आले आहे. एलजी मनोज सिन्हा यांनी 1 ऑगस्ट 2025 रोजी श्रीनगरमध्ये एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत 1990 साली ज्या ज्या काश्मिरी पंडितांची हत्या झाली होती, ती प्रकरण नव्याने खोलून त्यांचा तपास करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर ऑगस्ट 2025 मध्ये एसआयएने सरला भट्ट मर्डर केसमध्ये नव्याने तपास सुरू केला. 12 ऑगस्ट 2025 रोज एसआयएने श्रीनगरमध्ये 8 जागांवर छापेमारी केली. यात यासीन मलिक तसेच JKLF च्या अनेक दहशतवादी ठिकाणांचा समावेश होता. आता या प्रकरणआत 737 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. खटला पुन्हा नव्याने उभा करण्यात आला आहे.

सरला भट्ट यांचे आई-वडील वृद्ध झाले

दुसरीकडे सरला भट्ट यांच्या हत्येला 36 वर्षे लोटले आहेत. त्यामुळे मध्यल्या काळात बरंच काही घडून गेलं आहे. सरला भट्ट यांचे आई-वडील वृद्ध झाले आहेत. सरला भट्ट यांची मावशी प्रेदिमन कृष्ण भट्ट यांनी 36 वर्षांपासून न्याय मिळाला नाही. आता सध्याच्या प्रक्रियेला काही अर्थ उरत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

209 काश्मिरी पंडितांची हत्या

दरम्यान, पोलिसांच्या 2008 सालच्या एका रिपोर्टनुसार 1989 साली काश्मीर घाटीमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये 209 काश्मिरी पंडित मारले गेले. यातील 109 जणांची हत्या 1990 साली झाली. दुसरीकडे हत्येचा हा आकडा खूप जास्त असल्याचा दावा काश्मिरी पंडितांकडून केला जातो. याच काळात अनेक काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडून अन्य ठिकाणी वास्तव्यास जावे लागले, असे सांगितले जाते.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?