AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही तर सियापेक्षाही डेंजर निघाली, साखरपुड्यानंतर थेट बॉयफ्रेंडला..; अंगावर काटा आणणारी घटना!

सध्या सगळ्या देशात केतन अग्रवाल प्रकरणाने खळबळ उडवून दिली आहे. लग्न करायचं नव्हतं, म्हणून सिया गोयलने थेट लोहगडावरुन होणाऱ्या नवऱ्याला खोल दरीत ढकलून दिलं. आता असचं पण बिलकुल या उलट प्रकरण समोर आलं आहे.

ही तर सियापेक्षाही डेंजर निघाली, साखरपुड्यानंतर थेट बॉयफ्रेंडला..; अंगावर काटा आणणारी घटना!
ketan agrawal siya goyal reverse case (1)
| Updated on: Jun 26, 2026 | 9:27 AM
Share

सध्या देशभरात केतन अग्रवाल प्रकरणाची चर्चा आहे. केतनला त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिच्या प्रियकराने लोहगडावरुन खोलं दरीत ढकलून दिलं. या घटनेत केतनचा मृत्यू झाला. सियाचं केतन बरोबर लग्न ठरलं होतं. हॉलपासून इतर गोष्टींची लग्नाची कामं सुरु होती. मात्र, त्याआधी सियाने प्रियकराच्या मदतीने केतनला संपवलं. आता राजस्थानच्या टोक जिल्ह्यात बिलकुल या उलट एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. केतन अग्रवाल आणि सिया गोयल सारखीच ही केस आहे. फक्त त्यात थोडा फरक आहे. इथे प्रेयसीला साखरपुडा झाल्यानंतर प्रियकरापासून सुटका करुन घ्यायची होती. त म्हणून तिने प्रियकराला मार्गातून हटवण्यासाठी गुंडांना सुपारी दिली. गुंडांची दहशत आणि मानसिक तणावामुळे अखेर जयपूरमधल्या या मुलाने आपल्या मामाच्या घरात आयुष्याचा शेवट केला. राजस्थानच्या जगदीश नगरमधील ही घटना आहे. पोलिसांनी मृताची ओळख पटवली असून त्याचं नाव मनोज नामा आहे.

मनोजचा भाऊ पंकज नामाने पोलीस आणि मीडियाशी बोलताना सांगितलं की, “मनोजचे दीर्घकाळापासून एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. अलीकडेच त्या युवतीचं दुसरीकडे लग्न ठरलं होतं. त्यानंतर दोघांमध्ये सतत भांडणं व्हायची. घटनेच्या एक दिवस आधी सुद्धा दोघांमध्ये फोनवरुन जोरदार भांडणं झालं. मुलीकडून फसवणूक झाल्यामुळे मनोज मानसिक तणावाखाली होता”

त्यांना मनोजच्या मागे सोडलं होतं

मनोजपासून पाठलाग सोडवण्यासाठी मुलगी कुठल्याही पातळी पर्यंत जायला तयार होती असा नातेवाईकांनी गंभीर आरोप केला. मनोजला शारीरिक हानी पोहोचवण्यासाठी त्याला धमकावण्यासाठी तिने काही स्थानिक गुंडांना सुपारी दिली होती, असा नातेवाईकांचा आरोप आहे. त्यांना मनोजच्या मागे सोडलं होतं. गुंडांची हीच भिती आणि मानसिक दबावामुळे मनोज जयपूर सोडून टोकला निघून गेला.

म्हणून मामाच्या घरी आला

मनोज इथे लपण्यासाठी म्हणून मामाच्या घरी आला होता. या सुपारीबद्दल आणि त्याच्या जीवाला असलेल्या धोक्याबद्दल मनोजच्या कुटुंबाला त्याच्या एका मित्राकडून समजलं होतं. नातेवाईकांनी प्रेयसी आणि गुंडांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात