निवडणुकीच्या धामधुमीत ममता दीदी पुन्हा जखमी; घडले तरी काय

Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि जखमी होण्याचे जणू समीकरणच सुरु आहे. सर्वात अगोदर व्हीलचेअरवर पाय बांधलेला अवस्थेतील त्यांचा 'खेला होबे' हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर त्या जखमी झाल्या. आता हेलिकॉप्टरमध्ये चढताना हा प्रकार घडला.

निवडणुकीच्या धामधुमीत ममता दीदी पुन्हा जखमी; घडले तरी काय
अपघातांची मालिका सुरुच
Follow us
| Updated on: Apr 27, 2024 | 3:59 PM

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा एकदा जखमी झाल्या आहेत. दुर्गापूरमध्ये हेलिकॉप्टरमध्ये चढताना ममता बॅनर्जी यांना दुखापत झाली. त्या हेलिकॉप्टरमध्येच पडल्या. त्या दुर्गापूर येथून आसनसोल येथे जात होत्या. टीएमसी उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांच्या जाहीर सभेसाठी त्या जात होत्या. ममता बॅनर्जी जेव्हा हेलिकॉप्टरच्या आत जात होत्या. त्याचवेळी त्यांचा तोल गेला आणि त्या पडल्या. त्यांच्या पायाला थोडी दुखापत झाली.

सभेत होणार सहभागी

हेलिकॉप्टरमध्ये पडताच त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना तातडीने उठण्यासाठी मदत केली. दुर्गापूर येथून त्या लागलीच आसनसोलसाठी रवाना झाल्या. या ठिकाणी शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रचाराच्या सभेत त्या सहभागी होत आहे. सूत्रांनुसार त्यांची दुखापत गंभीर नही. टीएमसी सुप्रिमो काही दिवसांपूर्वी त्यांच्या निवासस्थानी पडल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या डोक्याला जखम झाली होती. त्यांना उपचारासाठी तात्काळ एसएसकेएम रुगालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या डोक्याला काही टाके घालण्यात आले होते. कोणीतरी मागून धक्का दिल्याने त्या डोक्यावर पडल्याचे समोर आले होते.

हे सुद्धा वाचा

व्हीलचेअरवर केला होता प्रचार

यापूर्वी 2021 मध्ये विधानसभा निवडणुकीत त्या नंदीग्राम येथे प्रचारासाठी गेल्या होत्या. त्यावेळी गर्दीत धक्का-बुक्की करण्यात आली. ममता बॅनर्जी यांचा पाय एका लोखंडी खंब्याला जोरात लागला. त्यामुळे त्यांना दुखापत झाली. रेयापारमधील एका मंदिराबाहेर ही घटना घडली होती. टीएमसीने हा भाजपचा कट असल्याचा आरोप केला होता. तर भाजपने ममता बॅनर्जी या सहानभूती मिळविण्यासाठी हे नाटक करत असल्याचा आरोप केला होता. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी प्लास्टरसह व्हील चेअरवर बसून प्रचार केला होता.

अपघातांची मालिका

गेल्या काही काळापासून अपघातांची मालिका सुरु आहे. जानेवारी 2024 मध्ये प्रवासादरम्यान कारचा ब्रेक जोरात लागला. त्यावेळी ममता बॅनर्जी समोरच्या दिशेने जोरात आपटल्या. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. 2021 मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पायाला लोखंडी खंबा लागल्याने गंभीर दुखापत झाली होती. 2023 मध्ये त्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग झाले होते. तेव्हा ममता बॅनर्जी यांच्या डाव्या गुडघ्याला आणि पाठीला दुखापत झाली होती.

Non Stop LIVE Update
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले...
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले....
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट.
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका.
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.