AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मु्ंबई – दिल्ली एक्सप्रेस वे बद्दल दहा खास गोष्टी जाणून घ्या, 12 तासांत दिल्ली गाठवणारा हा मार्ग आहे कसा

दिल्ली - मुंबई द्रुतगती मार्गाच्या सोहना-दौसा पट्ट्याचे 12 फेब्रुवारी 2023 रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होत आहे. काय आहेत या महामार्गाची वैशिष्टये पाहुयात..

मु्ंबई - दिल्ली एक्सप्रेस वे बद्दल दहा खास गोष्टी जाणून घ्या, 12 तासांत दिल्ली गाठवणारा हा मार्ग आहे कसा
highwayImage Credit source: socialmedia
| Updated on: Feb 11, 2023 | 9:52 AM
Share

नवी दिल्ली  : मुंबई ते दिल्ली हा ( Delhi-Mumbai expressway )  महत्वाकांक्षी एक्सप्रेस वे वेगाने तयार होत आहे. तब्बल 1386 किमी लांबीच्या आणि मुंबई ते दिल्ली हे अंतर 12 तासांत कापणाऱ्या या महामार्गाच्या सोहना ते दौसा टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी 12 फेब्रुवारीला होत आहे. या मार्गाला तयार करण्यासाठी 12 लाख टन स्टील ( steel ) लागणार असून त्यातून 50 हावडा ब्रिज (Howrah Bridges ) तयार होतील असे म्हटले जात आहे. या महामार्गाचा सोहना ते दौसा हा टप्पा येत्या मंगळवार पासून प्रवाशांसाठी खुला होत आहे.

काय आहेत या महामार्गाची दहा वैशिष्ट्ये पाहूयात…

1 ) दिल्ली ते मुंबई एक्सप्रेस वे हा आठ पदरी एक्सेस कंट्रोल ग्रीन फिल्ड प्रोजेक्ट असून भविष्यात तो बारा पदरी करण्याची योजना आहे.

2) या महामार्गासाठी दिल्ली, हरीयाणा, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र अशा पाच राज्यात पंधरा हजार हेक्टर जमिन संपादन करावी लागणार आहे.

3) या महामार्गाच्या परिसरात 94 प्रवासी सुविधा तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे वापरकर्त्यांना त्याचा लाभ होईल.

4) या महामार्गावर 40 हून अधिक इंटरचेंजेस असणार आहेत. त्यामुळे कोटा, इंदूर, जयपूर, भोपाळ, वडोदरा आणि सूरत येथील वाहन चालकांना कनेक्टीविटी मिळणार आहे.

5) सोहना ते दौसा हा टप्पा येत्या मंगळवार पासून प्रवाशांसाठी खुला होत आहे.

6) या प्रकल्पाचे सुरूवातीचे बजेट 2018 साली 98000 कोटी होते. त्यासाठी 12 लाख स्टीलचा वापर होणार आहे. त्यातून कोलकात्याच्या हावडा ब्रिज सारखे पन्नास ब्रिज उभारता येतील.

7) दिल्ली – मुंबई एक्सप्रेसमुळे दिल्ली ते मुंबईचे प्रवासाचे अंतर 180 किमीने कमी होणार आहे. ( 1,424 किमी वरून 1,242 किमीवर येणार )

8 ) दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर अत्याधुनिक स्वयंचलित वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा असेल.

9 ) प्राण्यांना जाण्यासाठी ओव्हरपास, अंडरपास असणारा हा भारतातील आणि आशियातील पहिला एक्सप्रेसवे आहे. रणथंबोर वन्यजीव  अभयारण्यात प्राण्यांच्या अधिवासाची खास काळजी घेत त्याचे बांधकाम होत आहे.

10 ) दिल्ली – मुंबई द्रुतगती मार्गाच्या सोहना-दौसा पट्ट्याचे 12 फेब्रुवारी 2023 रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होत आहे. उद्घाटनानंतर तो प्रवाशांसाठी खुला केला जाईल. त्यामुळे दिल्ली ते जयपूर दरम्यानचा प्रवास कालावधी दोन तासांपर्यंत कमी करण्यात मदत होईल.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच