नवी दिल्ली : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला तीन दिवस उरले आहेत. 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी नव्या संसदेत सुरक्षा व्यवस्था कशी असणार, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. 13 डिसेंबर 2001 रोजी सध्याच्या संसदेवर दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात 9 सुरक्षा जवान शहीद झाले होते. त्यामध्ये दिल्ली पोलिसांचाही समावेश होता.