Lakhimpur Kheri Violence: मृत्यूमुखी पडलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्याही घरी जायची प्रियंका गांधींची इच्छा, कुटुंबिय नेमकं काय म्हणाले?

प्रियंका गांधींनी या घटनेत मृत झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनाही भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, हे कुटुंब त्यांना भेटण्यासाठी इच्छुक नसल्याचं काळल्यानं, त्यांनी भेटण्याऐवजी त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

Lakhimpur Kheri Violence: मृत्यूमुखी पडलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्याही घरी जायची प्रियंका गांधींची इच्छा, कुटुंबिय नेमकं काय म्हणाले?
Priyanka Gandhi

लाखीमपूर खीरी: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा सध्या लाखीमपूर खीरी हिंसाचारात मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना भेटत आहे. याच दरम्यान, प्रियंका गांधींनी या घटनेत मृत झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनाही भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, हे कुटुंब त्यांना भेटण्यासाठी इच्छुक नसल्याचं काळल्यानं, त्यांनी भेटण्याऐवजी त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. ( Lakhimpur Kheri Violence: Priyanka Gandhi Wants to Visit Families of BJP Workers Killed in Violence )

लाखीमपूर खीरीमध्ये राहुल आणि प्रियंका यांनी जे शेतकरी यात मृत झाले त्यांच्यां कुटुंबीयांनी भेट घेतली. त्यानंतर या हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या पत्रकाराच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठीही प्रियंका पोहचल्या. पत्रकाराच्या कुटुंबीयांशी बोलताना, कुटुंबातील एका सदस्याने भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनाही भेटण्याचा सल्ला प्रियंका यांना दिला. मात्र, प्रियंका यावेळी म्हणाल्या की, मलाही त्यांच्या कुटुंबीयांना भेटायची इच्छा आहे, मात्र त्यांच्या कुटुंबीयांना मला भेटण्याची इच्छा नसल्याचं कळाल्याचं प्रियंकांनी सांगितलं.

प्रियंका म्हणाल्या की,”जे भाजपचे कार्यकर्ते या घटनेत मारले गेले आहेत, त्यांच्या कुटुंबानाही भेटण्याची माझी इच्छा होती, मी यासाठी आयजींना विचारणाही केली, मात्र, आयजींनी सांगितलं की, त्यांच्या कुटुंबाला तुम्हाला भेटायचं नाही”राहुल आणि प्रियंका वाड्रा सध्या धौराहरा तहसीलमधल्या रामनगर लहबडी गावात आहेत, तिथं ते मृतांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करत आहेत. भेटीगाठी घेतल्यानंतर ते लखनऊकडे रवाना होणार आहेत.

दुसऱ्या बाजूला पीडित कुटुंबाना मदत निधी देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. भाजपचं म्हणणं आहे की, या घटनेत मृत पावलेल्या आठही लोकांना मदतनिधी दिला जाईल, मात्र काँग्रेसकडून केवळ 5 लोकांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या हिंसाचारात 4 शेतकरी, 3 भाजप कार्यकर्ते आणि एका पत्रकाराचा मृत्यू झाला होता.

यूपी सरकारने घटनेत मृत पावलेल्या सर्वांना 45 लाख रुपयांच्या निधीची घोषणा केील आहे. बुधवारी मृत भाजप कार्यकर्ते श्याम सूंदर यांच्या कुटुंबीयांना 45 लाखांचा चेक देण्यात आला आहे. भाजपचे इतर 2 मृत कार्यकर्ते शुभम मिश्रा आणि ड्रायव्हर ओम मिश्रालाही चेक मिळाला आहे. शिवाय यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे.

हेही वाचा:

Lakhimpur Violence : लखीमपूर हिंसाचार प्रकरणात किती जणांना अटक? सुप्रीम कोर्टाचा सवाल, योगी सरकारला उत्तर देण्याचे आदेश

तोपर्यंत मी लढतच राहणार, पीडितांच्या कुटुंबाला मी वचन दिलंय; प्रियंका गांधींचा योगी सरकारला इशारा

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI