AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरे तुम्ही मला काय सांगतो मी एका आठवड्याला 12 कोटी उडवतो… ललित मोदीचा थेट खुलासा, आरोपांवर..

ललित मोदी यांनी नुकताच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ते मोठे खुलासे करताना दिसले. हेच नाही तर त्यांनी आठवड्याला नक्की किती खर्च करतो याचाच थेड आकडा सांगितला. त्यांच्या या आकड्याने सर्वांचे डोळे विस्फारले आहेत.

अरे तुम्ही मला काय सांगतो मी एका आठवड्याला 12 कोटी उडवतो... ललित मोदीचा थेट खुलासा, आरोपांवर..
Lalit Modi
| Updated on: Jun 04, 2026 | 1:21 PM
Share

इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलची सुरूवात करणारे ललित मोदी कायदेशीर गोष्टींमध्ये अडकले. आयपीएलला त्यानीच सुरूवात केली, ती त्यांची कल्पना होती. कायदेशीर गोष्टींमध्ये अडकल्यानंतर त्यांनी भारत सोडला. नुकताच ललित मोदीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे केले. स्वत:निर्दाेष असल्याचे म्हटले. हेच नाही तर त्यांच्या लाईफस्टाईलबद्दल बोलताना म्हटले की, मी दर आठवड्याला 10 ते 12 कोटी पैसे खर्च करतो. हेच नाही तर इतका पैसा कसा येतो हे देखील त्यांनी सांगितले. आठवड्याला 10 ते 12 कोटी खर्च करत असल्याच्या ललित मोदीच्या विधानाने एकच खळबळ उडाली. एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना ललित मोदीने म्हटले की, मी काहीच चुकीचे केले नाही. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी हिऱ्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो.

तुम्ही माझ्यावर काही कोटी घेतल्याचा आरोप करतात तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की, त्यापेक्षा मी एका दिवसात कितीतरी जास्त पट पैसा कमावतो. जगभरात माझी कंपनी असून ती खूप जास्त मोठी आहे. तिचा मार्केट भाव अडीच लाख कोटी आहे. मी माझ्या फॅमिली बिझनेसमधून पैसा कमावतो. मी त्या कंपनीचा मालक आहे. मी आता त्याचा कारभार माझ्या मुलांकडे दिला आहे. आता ते सर्वकाही सांभाळतात.

माझे मुले माझा खर्च उचलतात. मी एका खूप चांगल्या घरात राहतो. मी खूप जास्त चांगले जीवन जगतो. मी प्रत्येक ठिकाणी जातो. मी 10 ते 12 कोटी घेतो. जे मला फक्त 1 आठवडा पुरतात. हे असेच आहे आणि मी यासोबतच जन्मलो आहे. मी माझे आयुष्य आणि माझी जगण्याची पद्धत कोणासाठी का बदलावी? मी माझे आयुष्य इतर कोणासाठी का जगावे? माझ्या आजोबांनीही असे केले नाही. माझे वडीलही कोणा इतरांकरिता जगले नाहीत. यादरम्यान त्यांना विजय माल्या यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

त्यावेळी ललित मोदीने उत्तर देत म्हटले की, तो माझा मित्र आहे. ठीक आहे.. मला कळत नाही की, कोणाला काय समस्या असावी यात? हा पण त्याचे प्रकरण बॅंकांसोबत जोडले गेले आहे. हा पण आम्ही कधीच कोणाकडून काही उधार घेतले नाही. मी कोणाकडूनही पैस घेतले नाहीत. मी फक्त दुसऱ्यांना पैसे दिली आहेत. माझ्या कोणत्याही बिझनेसने बॅेकेकडून कर्ज घेतले नाही. आम्ही मार्लबोरो तयार करतो आणि तो जगातील नंबर 1 चा ब्रंड आहे. मी कधीही कोणतेही सरकारी काम घेतले नाही.

Follow Us
MH-CET घोटाळ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक; 99 पर्सेंटाईलचं गूढ उलगडा करा
Aaditya Thackeray PC | MH-CET घोटाळ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक; 99 पर्सेंटाईलचं गूढ उलगडा करा, मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं!
सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला?
Priyanka Gandhi | सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला? धर्मेंद्र प्रधानांवरून प्रियांका गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल,
MPSC Paper Case | कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल, सकाळपासूनच... हे काय घडलं?
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे...
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे दिशाभूल करणारे, म्हणत केला मोठा खुलासा
एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट...
MHT-CET Paper Case | एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट... काँग्रेस नेत्याचा धक्कादायक दावा
13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी...
CET Exam Scam | 13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी परीक्षेबाबत पालकांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपने खळबळ
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...  प्रफुल पेटल आणि शरद पवार भेटीची इनसाइड स्टोरी
बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात...
CET Exam Scam | बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात महाघोटाळ्याच्या आरोपांनी खळबळ!
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट चर्चेत
जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण?
CJP Protest | जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण कहाणी