AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Land Sliding : हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा भूस्खलन, 50-60 लोक अडकल्याची भीती, 10 मृतदेह सापडले, नेमकं काय घडलं?

हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) पुन्हा एकदा भूस्खलन झालेय. किन्नरमध्ये झालेल्या या भूस्खलनात (Kinnaur Landslide) बस ढिगाऱ्याखाली दबली गेली. त्यामुळे जवळपास 50-60 जण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या असल्याची शक्यता आहे.

Land Sliding : हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा भूस्खलन, 50-60 लोक अडकल्याची भीती, 10 मृतदेह सापडले, नेमकं काय घडलं?
| Edited By: | Updated on: Aug 12, 2021 | 7:07 AM
Share

शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) पुन्हा एकदा भूस्खलन झालेय. किन्नरमध्ये झालेल्या या भूस्खलनात (Kinnaur Landslide) बस ढिगाऱ्याखाली दबली गेली. त्यामुळे जवळपास 50-60 जण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या असल्याची शक्यता आहे. आयटीबीपीच्या जवानांनी आतापर्यंत 14 लोकांना सुरक्षित बाहेर काढले. याशिवाय 10 मृतदेह देखील सापडले आहेत.

घटनास्थळावर ITBP च्या 3 बटालियनमधील 200 जवान पोहचलेत, अशी माहिती ITBP चे प्रवक्ते विवेक पांडे यांनी दिलीय. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी या घटनेत 50-60 लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केलीय. सुरक्षित वाचवण्यात आलेल्या लोकांना रुग्णालयात नेण्यात आलं. ITBP सोबत NDRF आणि पोलीसही घटनास्थळावर पोहचलेत.

लवकरच परिस्थितीवर नियंत्रण मिळेल, असंही सांगण्यात येतंय. केंद्रीय गृहमंत्रालयाने आवश्यक ती सर्व मदत देण्याचं आश्वासन दिल्याचंही ठाकूर यांनी सांगितलंय. भारतीय सैन्याने देखील मदतीचा हात देऊ केलाय. या भूस्खलनात एक ट्रक आणि एचआरटीसीच्या 4 बस आल्याचीही माहिती मुख्यमंत्री ठाकूर यांनी दिली. दरम्यान, जवानांनी बसच्या चालक आणि वाहकाला वाचवलं आहे. उर्वरित प्रवाशांना वाचवण्याचं काम सुरू आहे.

बसमधील 40 प्रवाशी बेपत्ता, शोध सुरू

विशेष म्हणजे भूस्खलन अजूनही सुरू असल्यानं बचाव कार्यात अडथळे येत आहेत. जवळपास 40 बस प्रवाशी अजूनही बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्याचं काम सुरू आहे. यात जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचं पथकही घटनास्थळी पोहचलंय. ढिगाऱ्याखाली दबलेली बस मूरंग-हरिद्वार मार्गावरील आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार त्यात 35-40 प्रवाशी होते.

हेही वाचा :

Video: हिमाचलमध्ये भयानक भूस्खलन, थरारक घटनेत क्षणार्धात लोखंडी ब्रीज कोसळला, 9 मृत्यू

पुण्यात अतिवृष्टीचा फटका, 12 गावं अंधारात, 7 गावांचा संपर्क तुटला, संपूर्ण कोंढरी गाव स्थलांतरीत

केंद्राने गुजरातला 1 हजार कोटी दिले, तसे महाराष्ट्राला पॅकेज देऊ शकते : अजित पवार

व्हिडीओ पाहा :

Land sliding in Kinnaur Himachal Pradesh many people fear to trapped

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.