Lawrence Bishnoi : केवळ एकाला मारू…पाकिस्तानला कायमचा धडा शिकवू, लॉरेन्स बिश्नोई गँग मैदानात, पाकिस्तानला मोठी धमकी, कोणाचा गेम करणार?
Bishnoi Gang threat to Pakistan : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट आहे. 22 एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला होता. दोन्ही देशात टेन्शन असतानाच आता बिश्नोई गँगने पाकिस्तानाला मोठी धमकी दिली आहे.

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे हल्ला केला. त्यात निरपराध 26 पर्यटकांना प्राण गमवावे लागले. 22 एप्रिल रोजी हा हल्ला करण्यात आला. तेव्हापासून पाकिस्तानविरोधात संतापाची लाट भारतात उसळली आहे. पाकिस्तानला धडा शिकवा अशी मागणी करण्यात येत आहे. पाकिस्तानने तर लष्करासह रणगाडे सुद्धा नियंत्रण रेषेवर तैनात केले आहे. भारत केव्हाही हल्ला करू शकतो, अशी भीती पाकिस्तानी लष्कराला वाटत आहे त्यातच आता बिश्नोई गँग सुद्धा मैदानात उतरली आहे. त्यांनी पाकिस्तानमध्ये या व्यक्तीचा गेम करणार असल्याची थेट धमकी पाकिस्तानला दिली आहे.
त्या पोस्टमध्ये काय?
कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगने जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी पाकिस्तानला दिली आहे. याविषयीची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. निष्पाप आणि निरपराध लोकांच्या हत्येचा बदल घेणार असल्याचे गँगने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानमध्ये घुसून एकाच व्यक्तीला उडवणार असल्याचे गँगने स्पष्ट केले आहे. ही व्यक्ती ठार होताच पाकिस्तानला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका बसणार असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.
कुणाचा होणार पाकिस्तानमध्ये गेम?
या पोस्टमध्ये दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा म्होरक्या आणि दहशतवाद्यांचा आका हाफिज सईद याचा फोटो लावण्यात आला आहे. त्याच्या चेहर्यावर क्रॉस असे चिन्हं आहे. त्याचा अर्थ हाफिजला ठार करणार असल्याचा दावा बिश्नोई गँगने केला आहे. ही पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे.

भारतात अनेक गुन्हेगारी घटना करणाऱ्या बिश्नोई गँगने आता पाकिस्तानात मोर्चा वळवला आहे. पाकिस्तानमध्ये सुद्धा या पोस्टची चर्चा होत आहे. गेल्या एका वर्षात पाकिस्तानमध्ये भारताविरूद्धचे अनेक दहशतवादी एका मागून एक ठार झाले आहेत. त्यांच्यावर अगदी जवळून गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. यामागे भारतीय गुप्तहेर संघटनेचा हात असल्याची ओरड स्थानिक पातळीवर होत आहे. पाकिस्तानला जाहीररित्या या दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्याची भूमिका घेता येत नसल्याची अडचण आहे. भारत हाफिज सईदचा खात्मा करू शकतो या भीतीने त्याच्या लाहोर येथील घराला सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. तर हाफिज हा लष्करी तळावर लपल्याचे समोर येत आहे.
