AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीचे आप सरकार पुन्हा अडचणीत; बस घोटाळ्याचा तपास उपराज्यपालांनी सीबीआयकडे वळवला

दिल्ली सरकारने उपराज्यपालांवर पलटवार करत बस खरेदीचे टेंडर रद्द करण्यात आले होते, आणि त्यानंतर बस खरेदीच केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे राज्यपालांवर आपकडून गंभीर आरोप करत नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी चौकशीचे आदेश दिले असल्याचे आपने म्हटले आहे.

दिल्लीचे आप सरकार पुन्हा अडचणीत; बस घोटाळ्याचा तपास उपराज्यपालांनी सीबीआयकडे वळवला
| Updated on: Sep 11, 2022 | 2:35 PM
Share

नवी दिल्लीः ज्या आपने भ्रष्टाचाराविरोधात देशभर नारा दिला त्याच आपवर (AAP) आता भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून आपच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. मनीष सिसोदियानंतर चर्चेत आलेल्या आप पक्षातील घोटाळ्याविरोधात आता उपराज्यपालांनीच त्यात उडी घेतली आहे. दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना (Deputy Governor V. K. Saxena) यांनी डीटीसी बस (DTC Bus) खरेदी घोटाळ्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला आहे. मुख्य सचिवांनी दिलेल्या अहवालानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. यावर दिल्ली सरकारने उपराज्यपालांवर पलटवार करत बस खरेदीचे टेंडर रद्द करण्यात आले होते, आणि त्यानंतर बस खरेदीच केल्या गेल्या नाहीत.

त्यामुळे राज्यपालांवर आपकडून गंभीर आरोप करत नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी चौकशीचे आदेश दिले असल्याचे आपने म्हटले आहे.

आम आदमी पक्ष अडचणीत

गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्षाच्या अडचणीत वाढच होताना दिसून येत आहे. दिल्लीच्या उपराज्यपालांनी डीटीसी बस खरेदी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून त्याचा तपास आता सीबीआयकडे देण्यात आला आहे.

घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे

मुख्य सचिवांनी दिलेल्या अहवालानंतर उपराज्यपालांनी या घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे देण्यात आली आहे. या आधी दिल्लीतील मद्य घोटाळ्याचे आदेशही उपराज्यपालांनीचे दिले होते. त्यानंतर त्यांनी 1 हजार बस खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे सांगत त्यांनी त्याची चौकशी सीबीआयकडे दिली आहे.

बस खरेदीचे टेंडर रद्दच

बस घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे दिल्यानंतर मात्र आपने पलटवार करत उपराज्यपालांवर जोरदार टीका केली आहे. आपने स्पष्टपणे म्हटले आहे की, बस खरेदीचे टेंडर रद्दच करण्यात आले होते, त्यामुळे बस कधी खरेदी केल्याच नाहीत. त्यामुळे दिल्लीला सध्या शिकलेल्या सवरलेल्या उपराज्यपालांची गरज असल्याचे म्हटले आहे.

उपराज्यपालांवरही गंभीर आरोप

कारण उपराज्यपालांना आपण कशावर सह्या करतो आहोत तेच कळत नाही. तर उपराज्यपालांवरही गंभीर आरोप करत नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी ही चौकशी लावली असल्याची टीका केली आहे.

आरोग्यमंत्र्यांविरोधात बिनबुडाचे आरोप

या चौकशी नंतर आपने म्हटले आहे की, अशा चौकशीतून अजूनपर्यंत काहीच सिद्ध झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांविरोधात बिनबुडाच्या आरोपानंतर आता ते चौथ्या मंत्र्याविरोधात तक्रार करत आहेत मात्र आधी आपल्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे उत्तर द्या असंही त्यांनी यावेळी सांगितले.

उपराज्यापालांच्या मुलीली ठेका

दिल्लीच्या उपराज्यपालांवर आपनेही गंभीर आरोप केले आहेत. आपकडून म्हटले आहे की, खादी ग्रामोद्योग आयोगाच्या अध्यक्ष असताना त्यांनी 1400 कोटींचा घोटाळा झाला असून खादी ग्रामोद्योग विभागाचे टेंडर न काढताच त्यांनी आपल्या मुलीला त्याचा ठेका दिला होता असा आरोपही त्यांच्यावर केला गेला आहे.

त्यामुळे त्यांनी ज्या बस घोटाळ्याचे आदेश दिले आहेत त्या बस खरेदीचे टेंडरच रद्द करण्या आले होते. त्यामुळे सध्या दिल्लीला शिकल्या सवरलेल्या उपराज्यपालांची गरज असल्याची टीका करण्यात आली आहे.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....