लोकशाहीच्या युद्धात घराघरांत रणधुमाळी; भाऊ-बहिण, वहिनी-दिर, नणंद-भावजयीत जुंपली

Lok Sabha Election 2024 : सध्या लोकशाहीसाठी घराघरात भांडण सुरु असल्याचे चित्र आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील अनेक मतदारसंघात नात्यात हा सामना रंगला आहे. कुठे बहिणीने भाऊराजाविरोधात दंड थोपटले आहेत. तर कुठे नणंद-भावजयीत जुंपली आहे...

लोकशाहीच्या युद्धात घराघरांत रणधुमाळी; भाऊ-बहिण, वहिनी-दिर, नणंद-भावजयीत जुंपली
नात्यांत रंगला सामना; या मतदारसंघाकडे भारताचे लक्ष
Follow us
| Updated on: Apr 16, 2024 | 9:27 AM

लोकशाहीतील सर्वात मोठ्या युद्धाचा शंखनाद झालेला आहे. त्यात पहिल्या टप्प्यातील मतदानाला उद्यापासून 17 एप्रिलपासून सुरुवात पण होत आहे. अनेक राज्यात पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीचे पण ढोल वाजवले जात आहेत. निवडणुकीच्या तोंडावर प्रचाराचा धडका सुरु आहे. स्टार प्रचारकांपासून ते पक्षाच्या कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येक जण त्यांच्या उमेदवाराचा जमके प्रचार करत आहे. प्रत्येक पक्ष जाहिरनामा, वचनं, आश्वासनांसह जनतेत जात आहेत. लोकशाहीची गोड फळं चाखण्यासाठी घराघरांत, नात्यात सुद्धा सामना रंगला आहे.

घराघरांत रणधुमाळी

  1. महाराष्ट्रापासून ते ओडिशापर्यंत अनेक मतदारसंघात नात्यातील हा सामना पाहायला मिळत आहे. कुठे बहिणीने भावाविरोधात दंड थोपाटले आहेत तर कुठे नणंद-भावजयीत सामना रंगला आहे. 1984 मध्ये अमेठी मतदारसंघात राजीव गांधी यांच्याविरोधात त्यांचे लहान भावाच्या पत्नीने मेनका गांधी यांनी निवडणूक लढवली होती. त्यांचा पराभव झाला होता.
  2. 10 वर्षांपूर्वी 2014 मध्ये बंगालमधील रायगंज मतदारसंघात दिर-वहिणी एकमेकांसमोर होते. काँग्रेसचे प्रियरंजन दासमुंशी यांची पत्नी दीपा दासमुंशी यांना तिकीट मिळाले होते. तर त्यांच्याविरोधात तृणमूलच्या तिकिटावर त्यांचे दीर सत्यरंजन दासमुंशी यांनी निवडणूक लढवली होती
  3. हे सुद्धा वाचा
  4. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशाच्या रणधुमाळीत असाच सामना पाहायला मिळाला होता. मुलायम सिंह यादव यांचे भाऊ शिवपाल यादव यांना घरातील सदस्य आणि पुतण्या अक्षय यादवने आव्हान दिले होते. अक्षय यांचा यामध्ये पराभव झाला होता.

येथे तर पती-पत्नीच एकमेकांविरोधात

पश्चिम बंगालमधील बिष्णुपूर लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण देशात चर्चा आहे. येथे तर पती-पत्नीच एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. भाजपने या मतदारसंघात सध्याचे खासदार सौमित्र खान यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने त्यांची माजी पत्नी सुजाता मंडल यांना तिकीट दिले आहे. यापूर्वी खान यांनी टीएमसीच्य श्यामल संत्रा यांना हरवले होते.

महाराष्ट्रात रंगला नात्यात सामना

महाराष्ट्रात दोन मतदारसंघ चर्चेत आहेत. त्यात बारामतीमध्ये NCP शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि त्यांचे बंधू अजित पवार यांच्या गटाच्या आणि त्यांच्या वहिणी सुनेत्रा पवार यांच्यात सामना होत आहे. उस्मानाबादमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाने ओम राजे निंबाळकर यांना तिकीट दिले आहे. तर भाजपने राणा जगजीतसिंह पाटील यांची पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली आहे. अर्चना पाटील या निंबाळकरांच्या नात्याने वहिणी आहेत.

आंध्रमध्ये भाऊ-बहिणीत टक्कर

आंध्र प्रदेशातील कडप्पा या मतदारसंघातही नात्यातील संघर्ष पाहायला मिळेल. कडप्पा मतदारसंघात YSR काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनी त्यांचा चुलत भाऊ वाय. एस. अविनाश रेड्डी यांना मैदानात उतरवले आहे. तर काँग्रेसने या मतदारसंघात जगन मोहन यांची बहिण वाय. एस. शर्मिला यांना तिकीट दिले आहे.

ओडिशात दोन सख्ख्या भावात सामना

ओडिशातील चिकिटी विधानसभा निवडणुकीतही असाच सामना रंगणार आहे. येथे दोन सख्ख्या भावांमध्ये आमदारकीसाठी लढत होत आहे. या मतदारसंघत रविंद्रनाथ द्यान सामंत्रा काँग्रेसच्या तिकिटावर तर त्यांचे बंधू मनोरंजन द्यान सामंत्रा हे भाजपच्या तिकिटावर आमने-सामने आले आहेत. त्यांचे वडील चिंतामणी ज्ञान सामंतराय हे ओडिसा विधानसभेचे माजी अध्यक्ष आहेत.

Non Stop LIVE Update
नोकऱ्यांमध्ये 100% आरक्षण, खासगी कंपन्यांमधील 'या' पदांसाठी प्राधान्य
नोकऱ्यांमध्ये 100% आरक्षण, खासगी कंपन्यांमधील 'या' पदांसाठी प्राधान्य.
विठुरायाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना...राज ठाकरे याचं साकडं काय?
विठुरायाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना...राज ठाकरे याचं साकडं काय?.
तुम्ही वारकरी नाही, पाठीत वार करणारे... अरविंद सावंतांचा रोख कोणावर?
तुम्ही वारकरी नाही, पाठीत वार करणारे... अरविंद सावंतांचा रोख कोणावर?.
हेलिकॉप्टर भरकटल तरी फडणवीसांच्या निवांत गप्पा;दादांनी सांगितला किस्सा
हेलिकॉप्टर भरकटल तरी फडणवीसांच्या निवांत गप्पा;दादांनी सांगितला किस्सा.
मराठा समाजाला फसवणारा सर्वांत बेईमान नेता शरद पवार; कोणाची जहरी टीका?
मराठा समाजाला फसवणारा सर्वांत बेईमान नेता शरद पवार; कोणाची जहरी टीका?.
हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठलमंदिर पाहिलय? तब्बल 46 वर्षांनी पाण्याबाहेर
हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठलमंदिर पाहिलय? तब्बल 46 वर्षांनी पाण्याबाहेर.
कोकणात 4 दिवस धुव्वाधार,मुंबई पुण्यात कसा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज?
कोकणात 4 दिवस धुव्वाधार,मुंबई पुण्यात कसा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज?.
स्वच्छ, नितळ चंद्रभागेत स्नान करण्यास तीरावर वारकऱ्यांची तुफान गर्दी..
स्वच्छ, नितळ चंद्रभागेत स्नान करण्यास तीरावर वारकऱ्यांची तुफान गर्दी...
शिंदेंसह 'या' वारकरी दाम्प्त्याला विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान
शिंदेंसह 'या' वारकरी दाम्प्त्याला विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान.
जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला...बघा महापूजेनंतर विठुरायाच गोजिर रुप
जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला...बघा महापूजेनंतर विठुरायाच गोजिर रुप.