AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तरुणाने चक्क 8 वेळा भाजपाला मतदान केले, व्हिडीओ केला व्हायरल, पाहा काय प्रकरण

उत्तर प्रदेशातील एक खळबळजनक व्हिडीओ व्हायरल होत आहे. समाजमाध्यमावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक तरुण भाजपाला आठवेळा मतदान करीत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

तरुणाने चक्क 8 वेळा भाजपाला मतदान केले, व्हिडीओ केला व्हायरल, पाहा काय प्रकरण
Loksabha 2024Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: May 20, 2024 | 5:43 PM
Share

उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने एकट्याने भाजपाला चक्क आठ वेळा मतदान केल्याचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्याच्या नयागाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून या प्रकरणात आयपीसीच्या कलम 171-एफ आणि 419, आरपी अॅक्टच्या कलम 128, 132 आणि 136 कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या तरुणाने या प्रकाराचा व्हिडीओ समाजमाध्यमावर दाखल केल्यानंतर खळबळ उडाली त्यानंतर आता या ठिकाणचे मतदान पुन्हा करण्याची विनंती निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे.

सलग आठ वेळा भाजपाला मतदान करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची ओळख पटवून त्याच्या गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील तरुणाचे नाव अनिल सिंह असून तो खिरीया पमारान गावचा रहिवासी आहे. युपीचे मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिणवा यांनी सांगितले की या मतदान केंद्रातील सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर चौकशी करुन प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच उत्तर प्रदेशातील इतर मतदान केंद्रांवर मतदाराची ओळख आणि कागदपत्रं तपासण्याचे काम काळजीपूर्वक करण्याचे आदेश दिले आहेत.

तरुणाचा हाच व्हिडीओ –

समाजवादी पार्टीचे ट्वीट

संबंधित तरुणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय क्षेत्रात तसेच प्रशासनात खळबळ उडाली आहे. कथित व्हायरल व्हिडीओत दिसणाऱ्या या तरुणाने भाजपाला मत देताना दिसत आहे. हा व्हिडीओ समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्वीट केला आहे. त्यात अखिलेश यादव यांनी जर निवडणूक आयोगाला यात काही चुकीचे झाले आहे असे वाटत असेल तर त्यांनी काही कारवाई जरुर करावी, अन्यथा..भाजपाची बूथ  कमिटी प्रत्यक्षात लूट कमिटी आहे अशी पोस्ट समाजमाध्यमावर केली आहे.

Follow Us
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...