LPG Cylinder Rate: घरगुती अन् कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या ताज्या किंमती जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
LPG cylinder price : घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या नव्या किंमती जाहीर झाल्या आहेत. तुमच्या शहरात घरगुती आणि कमर्शियल सिलिंडर कितीला मिळतोय, ते जाणून घ्या..

आखातातील युद्धाचा देशातील सर्वसामान्यांच्या खिशाला जबर फटका बसत आहे. महागाईचा दर एप्रिलमध्ये 8.3 टक्क्यांवर म्हणजेच 42 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. नुकतेच दूधाचेही दर वाढले. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईची झळ अधिक बसत आहे. अशातच सरकारने घरगुती वापराचे एलपीजी सिलिंडरचे दर स्थिर ठवले असले तरी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर जागतिक बाजाराशी जोडलेले असल्याने ते मधल्या काळात दर पंधरवड्याला वाढत आले आहेत. घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे नवीन दर काय आहेत, ते जाणून घेऊयात..
राजधानी दिल्लीत 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 913 रुपये आहे. तर पाच किलोचा सिलिंडर 339 रुपयांना मिळत आहे. याशिवाय 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 3071.50 रुपयांवर कायम आहे. मुंबईत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 912.50 रुपये असून कमर्शियल गॅस सिलिंडर 3024 रुपयांना मिळत आहे. चेन्नईमध्ये घरगुती सिलिंडरची किंमत 928.50 रुपये असून व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 3237 रुपयांना मिळत आहे. कोलकातामध्ये घरगुती सिलिंडर 939 रुपयांना आणि कमर्शियल गॅस सिलिंडर 3202 रुपयांना मिळत आहे.
पाटणामधील एलपीजी सिलिंडरच्या किंमती
घरगुती एलपीजी सिलिंडर- 1002.50 रुपये व्यावसायिक एलपीजी सिलिंडर- 3346.50 रुपये
नोएडामधील एलपीजी सिलिंडरच्या किंमती
घरगुती एलपीजी सिलिंडर- 910.50 रुपये व्यावसायिक एलपीजी सिलिंडर- 3071.50 रुपये
लखनऊमधील एलपीजी सिलिंडरच्या किंमती
घरगुती एलपीजी सिलिंडर- 950.50 रुपये व्यावसायिक एलपीजी सिलिंडर- 3194 रुपये
जयपूरमधील लखनऊमधील एलपीजी सिलिंडरच्या किंमती
घरगुती एलपीजी सिलिंडर- 916.50 रुपये व्यावसायिक एलपीजी सिलिंडर- 3099 रुपये
गुरुग्राममधील एलपीजी सिलिंडरच्या किंमती
घरगुती एलपीजी सिलिंडर- 921.50 रुपये व्यावसायिक एलपीजी सिलिंडर- 3088 रुपये
प्रत्येक देशात एलपीजी सिलिंडरच्या किंमती वेगवेगळ्या का असतात?
अनेक देशांमध्ये एलपीजीच्या किंमती प्रामुख्याने टॅक्स आणि अनुदानामुळे बदलतात. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसची किंमत साधारणपणे सारखीच असली तरी प्रत्येक देश आपल्या गरजा आणि आर्थिक परिस्थितीनुसार त्यावर कर लावतो किंवा अनुदान देतो. यामुळे काही भांमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किंमती स्वस्त असतात, तर इतर ठिकाणी त्या जास्त असतात.
आता सिलेंडरच्या वितरणावेळी ओटीपी अनिवार्य आहे. ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर मिळालेला ओटीपी डिलिव्हरी एजंटला सांगावा लागेल. अनुदानित सिलेंडर योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचावेत आणि गैरवापर टाळता यावा, यासाठी ही प्रणाली लागू करण्यात आली आहे. सरकारने एलपीजी सिलिंडर बुकिंगच्या नियमांमध्येही बदल केला आहे. शहरी भागांमध्ये बुकिंगमधील अंतर जे पूर्वी 21 दिवसांचं होतं, ते आता 25 दिवसांपर्यंत वाढवण्यात आलं आहे. तर ग्रामीण भागांमध्ये हे अंतर 45 दिवसांपर्यंत असू शकतं. त्यामुळे ग्राहकांना आता त्यांच्या रिफिलचं अधिक काळजीपूर्वक नियोजन करावं लागेल. पुरवठ्याचं उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी आणि अनावश्यक बुकिंग टाळण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.
