.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Supply : 1 मे पासून बदलणार एलपीजी पुरवठ्याचे नियम; बुकिंग प्रक्रिया, ओटीपी, ई-केवायसीबद्दल जाणून घ्या..

LPG Supply : आखाती देशांमधील तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. एलपीजी पुरवठ्यासंबंधीच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. हे बदल येत्या 1 मे पासून लागू होतील.

LPG Supply : 1 मे पासून बदलणार एलपीजी पुरवठ्याचे नियम; बुकिंग प्रक्रिया, ओटीपी, ई-केवायसीबद्दल जाणून घ्या..
LPG CylindersImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 28, 2026 | 12:22 PM
Share

LPG : पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक स्तरावर तेल आणि गॅसच्या पुरवठ्याला मोठा फटका बसला आहे. यामुळे सरकारने देशांतर्गत एलपीजी वितरण प्रणाली आणखी कडक केली आहे. एलपीजी पुरवठ्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. येत्या 1 मे पासून एलपीजी ग्राहकांसाठी हे नवीन नियम लागू होतील. आता सिलेंडरच्या वितरणावेळी ओटीपी अनिवार्य आहे. ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर मिळालेला ओटीपी डिलिव्हरी एजंटला सांगावा लागेल. अनुदानित सिलेंडर योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचावेत आणि गैरवापर टाळता यावा, यासाठी ही प्रणाली लागू करण्यात आली आहे.

बुकिंग कालावधी

सरकारने एलपीजी सिलिंडर बुकिंगच्या नियमांमध्येही बदल केला आहे. शहरी भागांमध्ये बुकिंगमधील अंतर जे पूर्वी 21 दिवसांचं होतं, ते आता 25 दिवसांपर्यंत वाढवण्यात आलं आहे. तर ग्रामीण भागांमध्ये हे अंतर 45 दिवसांपर्यंत असू शकतं. त्यामुळे ग्राहकांना आता त्यांच्या रिफिलचं अधिक काळजीपूर्वक नियोजन करावं लागेल. पुरवठ्याचं उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी आणि अनावश्यक बुकिंग टाळण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.

ई-केवायसी

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आधार कार्ड आधारित ई-केवायसी अनिवार्य करण्यात आलं आहे. हा नियम फक्त अशा ग्राहकांसाठी आहे, ज्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. ज्यांनी आधीच ई-केवायसी पूर्ण केली असेल, त्यांना ती पुन्हा करण्याची गरज नाही. या योजनेच्या ग्राहकांना प्रत्येक आर्थिक वर्षांत एकदा ही प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे.

सिलिंडरच्या दरात वाढ

सरकारने अलीकडेच एलपीजीच्या दरात वाढ केली आहे. देशभरात घरगुती सिलिंडरच्या दरात 60 रुपयांनी वाढ झाली आहे. तर व्यावसायिक सिलिंडरच्या दरातही अल्पावधीत अनेक वेळा वाढ झाली. इंडियन ऑइल, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांच्याकडून पुरवठा आणि खर्चाचा आढावा घेतला जाणार असून येत्या 1 मे पासून आणखी दरवाढ होऊ शकते.

इराण-इस्रायल यांच्यातील सततच्या तणावामुळे ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. गॅस आणि तेलवाहू जहाजांची वाहतूक कमी झाल्याने भारताच्या एलपीजी पुरवठ्यावर स्पष्टपणे परिणाम झाला आहे. एलपीजीसाठी भारत मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. देशाच्या एकूण वापरापैकी जवळपास 60% पुरवठा परदेशातून होतो, त्यामुळे जागतिक परिस्थितीचा थेट परिणाम भारतावर होतो.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर