डार्लिंग तुझ्यासाठी मी 2 पेपर…प्रोफेसरच्या ऑडिओ किल्पने खळबळ; विद्यार्थिनीसोबत..; लोकांमध्ये प्रचंड संताप!
प्राध्यापकावर एका विद्यार्थिनीसोबत अशोभनीय संभाषण केल्याचा आरोप होत आहे. हा प्राध्यापक विद्यार्थिनीसाठी परीक्षेचा पेपर आऊट (लीक) केल्याचा दावा करत आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे जाणून घ्या...

प्राध्यापक आणि विद्यार्थांमध्ये अगदी जवळचे, आदराचे नाते असते. पण कधी कधी या नात्याला काळीमा फासला जाईल अशा घटना समोर येतात. सध्या असाच एक प्राध्यापक चर्चेत आहे. या प्राध्यपकाने विद्यार्थीसाठी चक्क दोन पेपर लिक केल्याची ऑडी क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमुळे प्राध्यापकाच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घ्या…
लखनऊ युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकावर एका विद्यार्थिनीसोबत अशोभनीय संभाषण केल्याचा आरोप होत आहे. हा प्राध्यापक विद्यार्थिनीसाठी परीक्षेचा पेपर आऊट (लीक) केल्याचा दावा करत आहे. या संभाषणाचा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रोफेसरला ताब्यात घेण्यात आले आहे.
“तू जर म्हणालीस, तर मी येऊन जाईन डार्लिंग…. तुला काय मदत हवी आहे ते फक्त सांग, तुझ्यासाठी सर्व काही ओपन आहे. मग कोणत्या दिवशी भेटायला येणार आहेस? मी तुझ्यासाठी दोन्ही पेपर आऊट केले आहेत. पूर्ण पेपर आऊट केला आहे, यार… तू ये ना… एकदाही भेटायला येणार नाहीस का…?” या गोष्टी लखनऊ युनिव्हर्सिटीच्या एका प्रोफेसरने एका विद्यार्थिनीला म्हटल्या आहेत. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर लखनऊ युनिव्हर्सिटी प्रशासन अलर्ट मोडवर आले आणि त्यांनी प्रोफेसरविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रोफेसरला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. नीट (NEET) पेपर लीक प्रकरणाचा उलगडा होत असतानाच, लखनऊ युनिव्हर्सिटीच्या या प्रकरणाने अनेक प्रश्न उभे केले आहेत.
पेपर आऊट करून प्रोफेसरने विद्यार्थिनीला दिली ऑफर
लखनऊ युनिव्हर्सिटीच्या जिओलॉजी (भूगर्भशास्त्र) विभागातील असिस्टंट प्रोफेसर परमजीत सिंह यांचा विद्यार्थिनीसोबतच्या कथित अशोभनीय संभाषणाचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. व्हायरल ऑडिओमध्ये परीक्षेशी संबंधित गोष्टींचा उल्लेखही ऐकायला मिळत आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर विद्यापीठ प्रशासन आणि पोलीस तातडीने अॅक्शन मोडमध्ये आले. हसनगंज पोलिसांनी परीक्षा नियंत्रकांच्या (Exam Controller) तक्रारीवरून गुन्हा दाखल करून प्रोफेसरला ताब्यात घेतले आहे. प्रोफेसरचे हे कृत्य सर्वांसमोर यावे, यासाठी संबंधित विद्यार्थिनीनेच हा व्हिडीओ/ऑडिओ व्हायरल केल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रोफेसर आणि विद्यार्थिनीमधील कथित संभाषण:
प्रोफेसर: “तर मग मला सांग, काही अडचण असेल तर, ठीक आहे मॅम. कोणत्या दिवशी भेटायला येणार आहेस? मी तुमचे दोन्ही पेपर आऊट केले आहेत.”
विद्यार्थिनी: “सर, मला येणे कठीण वाटत आहे, कारण सध्या घरी सुद्धा लक्ष द्यावे लागत आहे.”
प्रोफेसर: “जेव्हा तुझी कोर (Core) आणि इलेक्टिव्ह (Elective) विषयाची परीक्षा असेल, तर त्यापूर्वी मला सांग. मी तुझ्यासाठी दोन्ही पेपर आऊट केले आहेत.”
विद्यार्थिनी: “सर, तसा मी अभ्यास केला आहे. माझा सिलॅबस (अभ्यासक्रम) पूर्ण झाला आहे.”
प्रोफेसर: “नाही-नाही… तू ये, तुझ्यासाठी मी पेपर आऊट करून देईन यार. पूर्ण पेपर माझ्याकडे ठेवलेला आहे, त्यामुळे तू ये.”
विद्यार्थिनी: “तसं सर माझा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे आणि सध्या घरातून बाहेर पडण्यासारखं वातावरण नाहीये. मी अभ्यास केला होता म्हणून.”
प्रोफेसर: “तर मग एकदाही भेटायला येणार नाहीस का?”
विद्यार्थिनी: “सर, सध्या मम्मीची तब्येत बघायची आहे… या कारणास्तव घरी थांबणे महत्त्वाचे आहे.”
प्रोफेसर: “तर मग सांग, कधीपर्यंत येऊ शकशील एकदा?”
विद्यार्थिनी: “सर, जरा घरातील परिस्थिती स्थिर होऊ द्या.”
प्रोफेसर: “सात दिवसांच्या आत?”
विद्यार्थिनी: “सर, सध्या तर परीक्षा आहेत, या संपू द्या, मग येते.”
प्रोफेसर: “परीक्षेच्या आधीच ये, तुझ्यासाठी दोन्ही पेपर आऊट केले आहेत.”
विद्यार्थिनी: “बरं सर, मी प्रयत्न करते. ज्या दिवशी घरातून बाहेर पडता येईल, तेव्हा बघते.”
प्रोफेसर: “प्रयत्न नाही, तुला यावेच लागेल. मग ७ दिवसांच्या आत ये.”
प्रोफेसर: “बच्चा, मामा ठीक आहेत ना सगळे?”
विद्यार्थिनी: “हो सर… सगळे ठीक आहेत.”
प्रोफेसर: “तर जर काहीही मदत हवी असेल, केजीएमयू (KGMU) मध्ये माझे अनेक ओळखीचे डॉक्टर्स आहेत, ठीक आहे डार्लिंग. जर तू म्हणालीस तर मी नक्की येईन. जर काही आर्थिक मदत (Financial Support) किंवा इतर काही मदत हवी असेल, तर तुझ्यासाठी सर्व काही ओपन आहे.”
विद्यार्थिनी: “नाही सर, अशी काही अडचण नाहीये… काम होऊन जाईल. एवढी काही मोठी समस्या नाही, होईल काम.”
२४ तासांच्या आत तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश
हे प्रकरण समोर आल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) च्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ परिसरात आंदोलन केले आणि प्रोफेसरवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. संस्थेची प्रतिमा मलिन करणाऱ्या कोणत्याही कृतीची गंभीर दखल घेतली जाईल, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कुलगुरू जे.पी. सैनी यांनी अंतर्गत तक्रार समितीला २४ तासांच्या आत या प्रकरणाचा तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे, पोलीस व्हायरल ऑडिओ आणि इतर पुराव्यांच्या आधारे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
