Maharashtra, Mumbai Rains News LIVE : परभणीच्या ताड पांघरीत गावाला जाणी लालपरी खड्ड्यात अडकली
Maharashtra, Mumbai Rains News LIVE Updates In Marathi : राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. गेल्या 4 दिवसांपासून पाऊस अजिबात थांबत नाही. अतिवृष्टी झाली. त्यामध्येच आजही पावसाचा मोठा इशारा देण्यात आला.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने मोठा हाहाकार माजवला आहे. अनेक भागात अतिवृष्टी झाली असून आजही मोठा इशारा देण्यात आला. जून महिन्यात जेवढा पाऊस झाला नाही त्यापेक्षा जास्त पाऊस जुलैच्या पहिल्या आठवड्यात झाला. मुंबई, पुणे, नाशिक, कोकणात पावसाने धुमाकूळ घातला. आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. काही धरणांमधून पाण्याचा विसर्गही सुरू करण्यात आला. मुंबईत मोठ्या प्रमाणात झाड कोसळली आहेत. काही जिल्ह्यांमध्ये आजही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. पुढील काही तासात पावसाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांनी काल मातोश्रीवर आमदारांची बैठक घेतली. मोठी बंडखोरी ठाकरेंच्या शिवसेनेत झाली. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच केला जाईल. तश्या घडामोडी दिल्लीत घडत आहेत. यासह राज्यातील, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील इतर बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..
LIVE NEWS & UPDATES
-
परभणीच्या ताड पांघरीत गावाला जाणी लालपरी खड्ड्यात अडकली
परभणीच्या ताड पांघरी गावाला जाणाऱ्या रस्त्याच्या दुरावस्थेचा परिवहन महामंडळच्या बसला फटका बसला आहे. पोखर्णी ते ताड पांघरी गावाला जाणारी बस खड्यात अडकल्याने अपघात झाला आहे. बसमध्ये बसलेल्या 12 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. खड्ड्यात अडकलेल्या बसला ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे.
-
डोंबिवली डॉक्टरांना मारहाण प्रकरण : शिंदेंचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक
डोंबिवलीतील एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर अखेर कारवाई करण्यात आली आहे. डॉक्टरांना मारहाण केल्याचे प्रकरण त्यांना भोवले असून त्यांना अखेर अटक करण्यात आली आहे.
-
-
लातूर : राचनावाडीजवळ स्कूल बस उलटली, 30 ते 35 विद्यार्थी जखमी
लातूर जिल्ह्यातल्या चाकुर तालुक्यातील राचनावाडीजवळ स्कूल बस उलटल्याने 30 ते 35 विद्यार्थी जखमी झाले आहेत. यापैकी दोन गंभीर जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले आहे. सांडोळ , महाडोळ येथील विद्यार्थी स्कूल बसने राचनावाडीकडे निघाले होते. चालक मोबाईलवर बोलत होता त्यामुळे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याकडेच्या खड्ड्यात जाऊन उलटली असं जखमी विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.
-
गोंदिया : एमआरपीपेक्षा जास्त दराने खत विक्री, कृषी विभागाची कारवाई
गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून खत खरेदीला वेग आला आहे. मात्र, काही ठिकाणी खताच्या कमाल किरकोळ किंमतीपेक्षा (MRP) अधिक दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. याची गंभीर दखल घेत कृषी विभागाने कारवाई सुरू केली असून, एका कृषी केंद्रावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
-
15 दिवस उशिरा मान्सून, गोंदिया जिल्ह्यात खरीप पेरणी अजूनही दोन टक्क्यांवर
गोंदिया जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन तब्बल 15 दिवस उशिरा झाल्याचा परिणाम खरीप हंगामातील पेरणीवर दिसून येत आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत जिल्ह्यात केवळ दीड ते दोन टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. मात्र मागील तीन ते चार दिवसांपासून झालेल्या समाधानकारक पावसामुळे आता पेरणीच्या कामाला वेग येण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
-
-
मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका – CM फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना म्हटले की, ‘ज्यांना कुत्रं विचारत नाही. ते मुख्यमंत्र्यांना सोशल मीडियावर शिव्या देत आहे. फडणवीसला शिव्या द्या. मला सवय आहे. शिव्या प्रुफ आहे मी. काही लोक पैसे घेऊन सोशल मीडियावर लिहित होते. हे भाड्याचे तट्टू होते. त्यांना सांगतो. महाराष्ट्राचा अपमान केला तर सोडणार नाही. मला बदनाम करा, पण महाराष्ट्राला बदनाम करू नका.’
-
मुसळधार पावसामुळे परशुराम घाटातील गॅबियन भिंत कोसळली
मुसळधार पावसामुळे चिपळून येथील परशुराम घाटातील गॅबियन भिंत कोसळली आहे. घाटातील काँक्रीटचा भाग तुटल्याने धोका वाढला आहे. पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी बांधलेले ४ सिमेंट काँक्रीट मार्ग. त्यापैकी ३ मार्ग तुटले. उर्वरित भागही कोसळण्याच्या स्थितीत.
-
राष्ट्रवादी NDAमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया
शरद पवारांची राष्ट्रवादी NDAमध्ये जाणार असल्याच्या चर्चेवर निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांचे राष्ट्रवादी एनडीए मध्ये दाखल होणार अशी अजून तरी चर्चा माझ्या कानावर नाही. जर आमच्या गुप्त बैठका झाल्या असतील तर मला बोलावलं असतं. आम्ही देखील अनेक मंत्र्यांना भेटत असतो, याचा अर्थ आमची राजकीय चर्चा होत नाही असे ते म्हणाले.
-
विरार पश्चिम एम बी इस्टेट जलमय
विरार पश्चिमच्या एम बी इस्टेट मधील १२ इमारती मागच्या पाच दिवसापासून पाण्याखाली आहेत. या इमारतीत ५२ तासापासून लाईट नाही, पिण्याचे पाणी नाही, मोबाईल नेटवर्क नाही, घरात रेशन नाही. एम बी एस्टेट, राम मंदिर रोड, रश्मी नगर, रामानंद भवन, पुनीता, रॉयल, मंगला दर्शन, मथुरेश, छाया सदन, छाया कुटीर या इमारती पाण्याखाली आहेत. या इमारतीच्या आवारात कंबरे इतक तर घरात गुडगाभर पाणी साचलेले आहे.
-
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिराला आकर्षक सजावट
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर समाधी मंदिराला आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे… विठोबाचा प्राण सखा माऊली माऊली हे वाक्य फुलांच्या माध्यमातून मंदिरावर सजवण्यात आलं आहे. मंदिराच्या बाहेर आणि गाभारा सभामंडप यामध्येही आकर्षक अशी रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे.
-
जळगावच्या पाचोऱ्यात संततधार पावसामुळे घर कोसळले
जळगावच्या पाचोऱ्यात संततधार पावसामुळे घर कोसळल्याची घटना समोर आली आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या चिमुकलीची प्रकृती चिंताजनक आहे. स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. चिमुकलीची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जळगावला हलविल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
-
उपमुखमंत्री एकनाथ शिंदे ॲक्टिव मोडमध्ये
उपमुखमंत्री एकनाथ शिंदे ॲक्टिव मोड मध्ये येणार. विधिमंडळ कामकाज अधिवेशनामध्ये उपस्थित राहण्याची शक्यता तसेच ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कशाला देखील भेट देण्याची शक्यता. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसापासून आजारी असल्यामुळे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना डिस्चार्ज मिळाला. मात्र आजारी असताना देखील त्यांनी राज्याचा पूर परिस्थिती आणि पावसाचा संदर्भात ऑनलाइनच्या माध्यमातून आढावा घेत होते.
-
अक्कलकुवाचे शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आमश्या पाडवी व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल
अक्कलकुवाचे शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आमश्या पाडवी यांच्या सभेतील वक्तव्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल. भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे यांच्या टीकेला आमदारांचे प्रत्युत्तर. मी आमदार नसतो तर माझ्यावर आरोप करणाऱ्यांची मान पिळून हत्या केली असती, असे वक्तव्य केल्याची चर्चा. माझ्यावर कोणीही खोटे आरोप करून नाहीत. मी आमदार आहे म्हणून गप्प बसलेलो असून माझ्यावर खोटे आरोप करून नाहीत. मतदारसंघात अनेक विकासकामे केल्याचा आमदारांचा दावा. व्हायरल व्हिडिओनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. आमदारांच्या वक्तव्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात.
-
खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात २७ हजार क्युसेस पाणी
खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात २७ हजार क्युसेस पाणी. खडकवासला धरणाच्या खालील पुलावर पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. पुलावरती गर्दी करू नका असं पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आवाहन. खडकवासला धरणातून मोठा विसर्ग सुरू….
-
पनवेलमधील mtnl रस्त्याला तळ्याच स्वरूप
पनवेलमधील mtnl रस्त्याला तळ्याच स्वरूप आलं आहें. वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहें. पुन्हा एकदा पनवेल महानगरपालिकेच्या नालेसफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहें.
-
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात तणाव कायम!
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात तणाव कायम! डॉक्टर मारहाण प्रकरणी दुसऱ्या दिवशीही सेवा ठप्प; आरोपीच्या अटकेशिवाय कामावर न परतण्याचा डॉक्टरांचा निर्धार. शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ सलग दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू. मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल असूनही आरोपी नगरसेवकाला अटक न झाल्याने डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा तीव्र संताप. रुग्णालयाचा मुख्य प्रवेशद्वार बंद; ओपीडीसह सर्व नियमित वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या. फक्त आपत्कालीन सेवा सुरू असल्याने उपचारांसाठी आलेल्या रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. कायदा-सुव्यवस्था बिघडू नये आणि रुग्णांना सुरक्षा मिळावी यासाठी रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. आरोपीला अटक होईपर्यंत कामावर न परतण्याचा निर्धार डॉक्टर, नर्स आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांनी व्यक्त …
-
बदलापूर-वांगणी दरम्यान राज्य महामार्ग पाण्याखाली
मुसळधार पावसामुळे बदलापूर आणि वांगणी दरम्यान असलेला राज्य महामार्ग पाण्याखाली गेलाय. या महामार्गावरची वाहतूक ठप्प झालीय. हा कल्याण कर्जत राज्य महामार्गावर असून या महामार्गावरून दररोज शेकडो वाहन ये-जा करत असतात. उल्हास नदी ओव्हर फ्लो झाल्यामुळे काजगाव जवळ हा महामार्ग बंद झालाय.
-
बदलापूर–पनवेल महामार्ग जलमय
बदलापूर–पनवेल महामार्ग जलमय. रस्त्याला आलं नदीचे स्वरूप. रस्त्यावर गुडघाभर पाण्यातून वाहन चालक आणि नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. गृह संकुलात जाताना नागरिकांना करावी लागत आहेत तारेवरची कसरत.
-
मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात पहाटेपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस
मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात पहाटेपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. सहा ते सात दिवसांपासून तालुक्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली होती. सध्या सर्वत्र पाऊस सुरू असल्याने शेतकरी वर्ग समाधानी असल्याचे चित्र आहे.
-
नाशिक रिंगरोडसाठी जागा द्यायला सगळे तयार, पण..सरोज अहिरे
नाशिक रिंगरोडसाठी माझा पाठिंबा. मात्र 22 गावातील शेतकरी बाधित होत आहेत. कवडीमोल भाव शेतकऱ्यांच्या जमिनीला मिळाला आहे. शेतकरी बांधवांच्या जागा घ्यायच्या आहेत, त्यासाठी अधिक भाव द्यावा. तांत्रिकदृष्ट्या शेतकऱ्यांच्या बाजूनं कमकुवत बाजू आहेत. सत्तेत आहे कारण शेतकरी आणि मतदारांमुळे. भाववाढ करावी अशी मागणी आहे. प्रकल्पाला विरोध नाही, जागा द्यायला सगळे तयार आहेत असं आमदार सरोज अहिरे म्हणाल्या.
-
वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ
सांगली जिल्ह्यात पावसाची संततधर सुरूचं आहे. त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या 3 दिवसापासून वारणा नदी ही पात्रा बाहेर पडली आहे.त्यामुळे वारणा नदी काठची शेती पाण्याखाली गेली आहे, तर बंधारे देखील पाण्याखाली आहेत.
-
श्रीकांत शिंदे यांच्याकडून डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा निषेध
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्री नगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण अत्यंत निषेधार्ह आहे. एक डॉक्टर म्हणून मला माहीत आहे की, रुग्णसेवा ही केवळ एक नोकरी नसून ती मानवतेची सेवा आहे. अत्यंत प्रतिकूल आणि तणावपूर्ण परिस्थितीत डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असतात असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.
-
महाराष्ट्रातील पूरस्थितीबद्दल अमित शाह-फडणवीसांमध्ये झाली चर्चा
महाराष्ट्रातील पूरस्थितीबद्दल अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांची चर्चा झाली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत करू असं आश्वासन यावेळी शाहांनी दिलं. राज्याच्या अनेक भागत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. त्याच संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.
-
पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुण्यातील खडकवासला धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरणातून मुठा नदीत 27 हजार खडकवासला क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळीमध्ये पावसाचा जोर वाढला तर आणखी पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. नदी काठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
-
भांडूपमध्ये बेस्ट बसचा अपघात, पादचाऱ्यासह वाहनांना धडक
भांडूपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात झाला आहे. पादचाऱ्यासह अनेक वाहनांना या बेस्ट बसने धडक दिली आहे. भांडूपच्या कोकणनगरमधील क्रिटिकल रुग्णालयाजवळ ही दुर्घटना घडली.
-
मुंबईत पड’झाड’ सुरूच, लोअर परेल येथे जुनं झाड कोसळलं
मुंबईत झाडं पडण्याच्या घटना सुरूच असून लोअर परेल येथे एक जुनं झाडं कोसळलं आहे. पावसामुळे हे मोठं झाड कोसळून खाली पडलं. मात्र सुदैवाने कोणीतीह जीवितहानी झालेली नाही.
-
इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे आळंदीतील चारही पूल वाहतुकीसाठी बंद
आळंदीत आज पावसाचा जोर कमी झाला असला, तरी इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे आळंदीतील चारही पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. वारकऱ्यांच्या सुरक्षितेला प्राधान्य देत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने आज होणारा पालखी प्रस्थान सोहळा अत्यंत मर्यादित उपस्थितीत पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे.
इंद्रायणी नदीने धोकादायक पातळी ओलांडल्याने शहरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
-
एपीएमसी भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर साचलं पाणी
नवी मुंबई- मुसळधार पावसामुळे एपीएमसी भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर पाणी साचलं असून व्यापारी, शेतकरी आणि ग्राहकांना मनस्ताप सहन करावा करतोय. नवी मुंबईतील आशियातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक असलेल्या एपीएमसी भाजी मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वारावर मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. सलग सुरू असलेल्या पावसामुळे बाजाराच्या प्रवेशद्वारावर जलभराव झाल्याने व्यापारी, शेतकरी, ग्राहक तसंच इतर येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
-
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक उशिराने
नालसोपारा-वसई रेल्वे स्थानकावरील ट्रॅकवर आजही पाणी साचलेलंच आहे. गेल्या दोन दिवसांपेक्षा आज थोडं पाणी ओसरलं असलं तरी ट्रॅकवर अद्याप पाणी आहेच. यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल अर्धा तास उशिराने धावत आहेत. तर मध्य रेल्वेवरील वाहतूकसुद्धा उशिराने आहे.
-
सोलापुरातील उजनी धरणातील पाण्याची पातळी वाढली
पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोलापुरातील उजनी धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. मागील चार दिवसांत झालेल्या पावसामुळे उजनी धरण प्लसमध्ये आलं आहे. उजनी धरणात 25 टक्के पाणीसाठा वाढल्याने सोलापूरकर सुखावले आहेत. काल उजनी धरणाची पाणी पातळी वजा 20 टक्के होती तर आज 5 टक्के प्लसमध्ये आलं आहे. गेल्या 24 तासांत 13.5 टीएमसी पाणीसाठा उजनीत वाढला आहे.
-
कर्जत तालुक्यातील पेठ आंबिवलीचा बंधारा फुटला
कर्जत तालुक्यातील पेठ आंबिवलीचा बंधारा फुटला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बंधारा फुटताच चिल्लर नदीला पूर आला आहे. नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर आपत्ती व्यवस्थापन पथकं सज्ज करण्यात आली आहेत.
-
मुंबईच्या समुद्रात एकामागून एक दोन संशयित जहाजे आढळल्याने खळबळ
मुंबईच्या समुद्रात एकामागून एक दोन संशयित जहाजे आढळल्याने खळबळ उडाली आहे. मनोरी बीचनंतर आता मढच्या कोळीवाडा समुद्रकिनाऱ्याजवळही एक संशयित जहाज दिसून आलं आहे. हे जहाज काल दिसलं होतं. सध्या संबंधित यंत्रणा या जहाजाचा मालक कोण आहे आणि हे जहाज मढला कसं पोहोचलं याचा तपास करत आहेत. तीन दिवसांपूर्वी गोराईच्या मनोरी बीचवर एक संशयित जहाज सापडलं होतं. ते जहाज भारतीय तटरक्षक दलाने आपल्या ताब्यात आणि निगराणीत घेतलं आहे. आता काल संध्याकाळी मालाडच्या मढ कोळीवाडा जवळ समुद्रात आणखी एक हा संशयित जहाज दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हे जहाज किनाऱ्यापासून सुमारे 7-8 किलोमीटर अंतरावर समुद्रात आहे. हे जहाज नेमकं कुठून आलं, ते कोणत्या देशाचं आहे आणि त्यात काय सामान आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तटरक्षक दल आणि स्थानिक पोलीस मिळून या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
-
येवला-नांदगाव राज्य क्रमांक 25 वर दुधाचा टँकर पलटला
येवला-नांदगाव राज्य क्रमांक 25 वर घाटात दुधाचा टँकर पलटल्याने मोठा अपघात झाला आहे. येवल्याच्या मुळुबाई घाटात टँकरचा ब्रेक न लागल्यामुळे भीषण अपघात झाला. टँकर घाटात जाऊन पलटी झाल्याने टँकरचं मोठं नुकसान होऊन चालक जखमी झाला आहे. जखमी चालकावर येवल्याच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-
अहिल्यानगर जिल्हयास यलो अलर्ट ; जिल्हयात सर्वदूर पावसाची हजेरी
दोन दिवसांपासून पावसाची संततधार. तर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस. भंडारदरा , मुळा आणि निळवंडे धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ. भंडारदरा 50% , मुळा 40 तर निळवंडेत 26 टक्के पाणीसाठा. खरिप पेरणीला मिळणार मुहूर्त. गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने खरिपाची पिके रखडली…
-
त्र्यंबकेश्वरात पहाटेच्या मुसळधार पावसाने पूरसदृश परिस्थिती
शहरातील मध्यवर्ती भागात रस्त्यांवरून पावसाच्या पाण्याचा वेगवान प्रवाह. जोरदार पावसात रस्त्यांवर नदीसारखी स्थिती. पावसाच्या पाण्याचा निचरा आणि ड्रेनेज व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न उपस्थित. स्थानिकांकडून कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी
-
पुणे मुंबई रेल्वे आजही बंद…
घाट परिसरातील ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल केबिन दरम्यान झालेल्या भूस्खलामुळे पुणे मुंबई दरम्यानची रेल्वे सेवा दुसऱ्या दिवशीही विस्कळीत होती रेल्वे मार्गाची दुरुस्ती न झाल्यामुळे मंगळवारी 14 रेल्वे गाड्या रद्द झाल्या आणि 13 रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले रेल्वे सेवा बंद असल्यामुळे दैनंदिन रेल्वे प्रवास करणाऱ्यांचे हाल झाले आज बुधवारी ही पुणे मुंबई रेल्वे बंद राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
-
मुक्ताईनगर तालुक्यात पहाटेपासून पावसाची पावसाची रिपरिप सुरू
शेती पिकांना मोठा जीवनदान शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 8 दिवसापासून पावसाच्या शेतकरी प्रतिशत होता. तालुक्यात हा पाऊस सर्वत्र होत आहे
-
24 तासात 140 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद..
सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये संततधर पाऊस सुरूच आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सलग सहाव्या दिवशी अतिवृष्टी झाली आहे,गेल्या 24 तासात 146 मिलिमीटर इतकया पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे चांदोली धरणाच्या पाण्यासाठी झपाट्याने वाढ झाली असून 34.40 टीएमसी क्षमता असणाऱ्या धरणामध्ये आता पाणी साठा झाला असून धरण 52 टक्के भरले आहे.धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असून धरणामध्ये 19 हजार क्यूसेक पाण्याचा आवक होत आहे.
-
पुण्यातील एकता नगर परिसरात मुठा नदीचे पाणी शिरले
सोसायटीच्या पार्किंग मध्ये शिरले पाणी. अनेक चारचाकी आणि दुचाकी देखील पाण्याखाली. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. खडकवासला धरणातून 270200 क्यूसेक्स सोडण्यात आलंय पाणी…
-
उल्हास नदी धोक्याच्या पातळी जवळ
बदलापुरात पावसाने विश्रांती घेतली असली तरीही कर्जत परिसरात पडणाऱ्या पावसामुळे बदलापूर शहरातून वाहणारी उल्हास नदीच्या प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. उल्हास नदी ही इशारा पातळीवरून वरून वाहत आहे . मात्र बदलापूरात पावसाचा जोर कमी असल्याने बदलापूर शहरात अजून कुठेही पाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या नाहीयेत , खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवली आहे .
-
पुण्यातील मुख्य रस्ते उद्या राहणार बंद..
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे उद्या पुणे शहरात एकत्रित आगमन होत आहे या सोहळ्या दरम्यान शहरातील वाहतूक सुरक्षित आणि नियोजनबद्ध ठेवण्यासाठी वाहतूक शाखेकडून गुरुवारी पहाटेपासूनच पालखी आगमन मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत…
Published On - Jul 08,2026 8:19 AM
