CNG पाठोपाठ दूध महागलं, आरेच्या दरात वाढ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय, मुंबईकरांचा विरोध

राज्य शासकीय योजनेच्या आरे दुधाच्या दरात 1 डिसेंबरपासून लिटरमागे एक रुपया दरवाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्य सरकारच्यावतीनं या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

CNG पाठोपाठ दूध महागलं, आरेच्या दरात वाढ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय, मुंबईकरांचा विरोध
दूध

मुंबई: राज्य शासकीय योजनेच्या आरे दुधाच्या दरात 1 डिसेंबरपासून लिटरमागे एक रुपया दरवाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्य सरकारच्यावतीनं या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. आरेच्या दुधाच्या दरात वाढण्यात करण्यात आली असली तरी या निर्णयाचा मुंबईकरांनी विरोध केलाय. सरकारच्या धोरणांमुळे महागाई वाढतेय अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सुधारित दर नेमके कसे आहेत

सुधारित दराप्रमाणे सरसकट लिटरमागे आरे दुधाच्या दरात एक रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर वितरकांचे कमिशन सरसकट 4 रुपये करण्यात आले आहे. आरे भूषण टोण्ड दूध प्रति लिटर 38 हून 39 रुपये करण्यात आले. अर्ध्या लिटरचा दर 19 रुपये होता, तो 20 रुपये करण्यात आला. गाय टोण्ड दूध 38 ऐवजी 39 रुपयांना मिळेल. अर्ध्या लिटरचा दर 20 रुपये असेल. आरे शक्ती गाय दूध 42 रुपये लिटर आहे, ते आता 43 रुपये होईल.अर्धा लिटर दुधाला 22 ऐवजी 23 रुपये मोजावे लागतील. फूल क्रीम दूध 47 रुपये लिटर होते, ते आता 48 रुपये या दराने घ्यावे लागेल. अर्ध्या लिटरचा दर 24 ऐवजी 25 रुपये असेल.

मुंबईकरांचा निर्णयाला विरोध

राज्य सरकारनं आरेच्या दूध विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असला तरी मुंबईकरांनी मात्र या निर्णयाला विरोध केला आहे. राज्य आणि केंद्र सरकच्या धोरणांमुळं महागाई वाढत असल्याचं मुंबईकरांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे मुंबईकरांना सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाल्यानं आणखी महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे.

सीएनजी पीएनजी महागलं

मुंबईत सीएनजी आणि पीएनजीचा पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडनं सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगर प्राधिकरण कार्यक्षेत्रात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर नवे दर लागू करण्यात आले आहेत. गेल्या सहा आठवड्यांमधील ही तिसरी दरवाढ आहे. आता मुंबईत 3 रुपये 06 पैशांची वाढ केल्यानंतर सीएनजी प्रति किलो 61.50 रुपयांना मिळेल. तर, पीएनजी गॅसची किमंत 2.26 रुपयांनी वाढवण्यात आल्यानंतर ती 36.50 रुपयांवर पोहोचली आहे.

इतर बातम्या:

VIDEO: कोणत्याही महामंडळाचं सरकारमध्ये विलीनीकरण शक्यच नाही, नवाब मलिक यांनी सांगितली व्यवहारिक कारणं

Aurangabad मध्ये चाललंय काय, क्रीडा संकुलात कोचला पाठलाग करू-करू चपलेने बेदम मारहाण

Maharashtra Government issue Government resolution to increase Arey Milk rates

Published On - 11:26 am, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI