राजनाथसिंहांनी इतिहासाची मोडतोड केली? महात्मा गांधींच्या सांगण्यावरुनच सावरकरांचा ब्रिटीशांकडे माफीनामा सादर केल्याचं वक्तव्य

विशिष्ट विचारसरणीचे लोक स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल नको नको ते खोटं पसरवतात. पण वीर सावरकरांचं योगदान अमुल्य आहे. इथून पुढे त्यांची बदनामी सहन केली जाणार नाही, असं राजनाथ सिंह म्हणाले.

राजनाथसिंहांनी इतिहासाची मोडतोड केली? महात्मा गांधींच्या सांगण्यावरुनच सावरकरांचा ब्रिटीशांकडे माफीनामा सादर केल्याचं वक्तव्य
महात्मा गांधी, राजनाथ सिंग आणि स्वातंत्र्यवीर सावरकर
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 12:01 PM

नवी दिल्ली : राष्ट्रीय नायकांच्या कार्याबद्दल वादविवाद होऊ शकतात, परंतु हिंदुत्ववादी विचारसरणीचे आहेत म्हणून वीर सावरकरांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणे किंवा त्यांचा अपमान करणं इथून पुढे खपवून घेतलं जाणार नाही, असं ठणकावून सांगताना महात्मा गांधींच्या सांगण्यावरुन अंदमान तुरुंगात असताना त्यांनी इंग्रजांकडे दयेसाठी याचिका केली होती, असा दावा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे.

विशिष्ट विचारसरणीचे लोक स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल नको नको ते खोटं पसरवतात. पण वीर सावरकरांचं योगदान अमुल्य आहे. इथून पुढे त्यांची बदनामी सहन केली जाणार नाही, असं राजनाथ सिंह म्हणाले. उदय माहुरकर आणि चिरायू पंडीत यांनी लिहिलेल्या वीर सावरकर- द मॅन व्हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राजनाथ सिंग बोलत होते.

गांधीजींच्या सांगण्यावरुनच सावरकरांनी दया याचिका केली

“सावरकरांसंबंधी आतापर्यंत खूप खोटे बोललं गेलंय. त्यांनी ब्रिटिश सरकारपुढे अनेक दया याचिका दाखल केल्या हे अनेक वेळा अनेकांनी सांगितलंय. परंतु त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी या याचिका दाखल केल्या नाहीत. सर्वसाधारणपणे कुठल्याही कैद्याला दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो. विशेष म्हणजे तुम्ही दया याचिका दाखल करा, असं महात्मा गांधींनीच सावकरकरांना सांगितलं होतं. गांधींच्या सूचनेवरूनच त्यांनी दया याचिका दाखल केली होती आणि महात्मा गांधींनी सावरकरांना तुरुंगातून मुक्त करण्याचं इंग्रजांना आवाहन केले होते. आम्ही ज्या प्रकारे शांततेच्या मार्गाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत, त्याच मार्गाने सावरकर लढतील असं गांधींजींनी इंग्रजांना सांगितलं होतं”, असंही राजनाथ सिंह पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात म्हणाले.

सावरकर इंग्रजांपुढे झुकले नाहीत

राजनाथ सिंह म्हणाले की, “वीर सावरकर एक महान स्वातंत्र्य सेनानी होते, अशा परिस्थितीत विचारसरणीच्या चष्म्यातून पाहून त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणे आणि त्यांचा अपमान करणे क्षम्य नाही. वीर सावरकर एक महान नायक होते, आहेत आणि भविष्यातही राहतील. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची त्यांची इच्छाशक्ती किती प्रबळ होती, याचा अंदाज अनेक प्रसंगावरुन आला.ब्रिटिशांनी त्यांना दोनदा जन्मठेपेची शिक्षा सुनावली, पण ते मागे हटले नाहीत.”

ज्यांनी सावकरांवर आरोप केलेत ते लेनिनवादी-मार्क्सवादी

काही लोक सावरकरांवर नाझी, फॅसिस्ट असल्याचा आरोप करतात पण सत्य हे आहे की ज्यांनी असे आरोप केले ते लेनिनवादी, मार्क्सवादी विचारसरणीने प्रभावित झाले आणि अजूनही आहेत. साध्या भाषेत सांगायचे झाले तर, सावरकर हे ‘वास्तववादी’ आणि ‘राष्ट्रवादी’ होते. ज्यांनी बोल्शेविक क्रांतीसह निरोगी लोकशाहीची चर्चा केली.

राजनाथ सिंग नेमकं काय म्हणाले, पाहा :

हे ही वाचा :

सत्तेची ऑफर न स्वीकारण्या इतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

VIDEO: हो… तुम्ही सांगायचे मी करायचे, आपला दसरा आपली परंपरा!!, पंकजा मुंडेंचं समर्थकांना दसऱ्याचं आवतन; व्हिडीओ व्हायरल

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.