Maoists: छत्तीसगडमध्ये मोठी चकमक; 16 माओवाद्यांचा खात्मा, कमांडर पापा रावला मोठा झटका, 3 जवान शहीद
Maoists Killed in Encounter: मार्च 2026 पर्यंत माओवाद्दी संपलेले असतील असा केंद्र सरकारचा दावा आहे. त्यासाठी दंडकारण्यासह बस्तर परिसरात मोठी चकमक उडाली आहे. यामध्ये 16 माओवाद्यांचा खात्मा झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. तर सुरक्षा दलाचे 3 जवान शहीद झाले आहेत.

Chhattisgarh Maoists Killed: छत्तीसगडच्या बिजापूर-दंतेवाडा सीमेवर सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली आहे. या चकमकीत 16 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. छत्तीसगड राज्यातील बिजापूर गंगानूर येथील जंगलातील घटना काल सायंकाळी साडेचार वाजेपासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत ही चकमक चालली. यात चकमकीत 16 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले. चकमकीत तीन पोलीस जवान शहीद झाले होते. सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत पोलिसांनी 12 माओवादी यांचे मृतदेह सापडले आहे. त्यानंतर पहाटे शोध मोहीम राबविण्यात आली त्यात चार माओवाद्यांचे मृतदेह आढळले. या चकमकीत 20 ते 22 माओवादी ठार झाले असावे असा पोलीस दलाचा अंदाज आहे.
पापा रावला मोठा झटका
गंगालूर परिसरातील जंगलात ही चकमक उडाली आहे. हा परिसर माओवादी कमांडर पापा राव याचा मानल्या जातो. त्याची या परिसरात मोठी दहशत होती. या जंगलात मोठ्या संख्येने माओवादी असल्याची खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी चोहोबाजूंनी त्यांना घेराव घातला. त्यानंतर माओवाद्यांनी फायरिंग केली. दोन्ही बाजूने गोळीबार सुरू झाला. त्यात 16 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर अजूनही या परिसरात गोळीबार सुरू असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. थांबून थांबून माओवादी गोळीबार करत आहेत. तर त्यांना सुरक्षा दल प्रत्युत्तर देत आहेत. मोठ्या संख्येने या परिसरात माओवादी लपल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सुरक्षा दलांनी व्यापक शोध मोहीम हाती घेतली आहे.
आतापर्यंत 12 माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात
आतापर्यंत 12 माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात आले आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाकडून या भागात शोध मोहीम राबवण्यात येत आहे. बिजापूरचे पोलीस अधिक्षक डॉ. जितेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9 वाजेपर्यंत डीआरजी दंतेवाडा-बिजापूर, एसटीएफष कोबरा आणि CRPF च्या संयुक्त पथकाकडून ऑपरेशन सुरु केले. अद्यापही चकमक सुरूच असल्याची माहिती त्यांनी दिली.
या संयुक्त पथकाने माओवाद्यांना ताबडतोब प्रत्युत्तर दिले. सुरक्षा दलाने आक्रमक पवित्रा घेतला. बस्तर रेंजचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी घटनास्थळावरून 12 माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले. या ठिकाणी एसएलआर, 303 रायफलसह मोठ्या प्रमाणात शस्त्र, दारुगोळा जप्त केला. मृत माओवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलातील बिजापूरचे प्रमुख मोनू वडाडी आणि दुकारु गोंडे हे शहीद झाले. तर जखमी जवान सोमदेव यादव यांच्यावर उपचार सुरू आहे. चकमक सुरूच असल्याने सुरक्षा दलाने अतिरिक्त कुमक पाठवली आहे.
