AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीत पुन्हा आगीचा भडका, भीषण आग, लोकांमध्ये भीतीचे वातावरण, थेट सर्व फ्लॅटखाली करत..

दिल्लीमध्ये सतत आगीच्या घटना पुढे येत आहेत. मालवीय नगरमधील घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा आग लागली. एका बहुमजली इमारतीच्या एका फ्लॅटला ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. अग्शिशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दिल्लीत पुन्हा आगीचा भडका, भीषण आग, लोकांमध्ये भीतीचे वातावरण, थेट सर्व फ्लॅटखाली करत..
Delhi Fire
| Updated on: Jun 05, 2026 | 9:37 AM
Share

दिल्लीमध्ये एका मागून एक आगीच्या घटना घडत आहेत. मालवीय नगरमध्ये हॉटेलला लागलेली आगीची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा नोएडामध्ये आग लागली. एका बहुमजली इमारतीला ही आग लागली. मालवीय नगरमध्ये लागलेल्या हॉटेलच्या आगीत 21 जणांचा जीव गेला. या घटनेला दोन दिवस होत नाहीत, तोवरच आता पुन्हा एकदा खळबळ उडाली. 7.20 ला ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. घटनेची अधिकची माहिती अशी की, नोएडाच्या सेक्टर 74 मधील आयव्ही काउंटी सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये आग लागली. अग्निशमन दलाची सहा वाहने घटनास्थळी दाखल झाली. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग 12 व्या मजल्यावर लागल्याचे सांगण्यात येत आहे.

फ्लॅटमधून आगीचे मोठे धूर बाहेर येत आहेत. आगीचा भडका उडालाय. काळा धूर आणि आगच सर्वत्र दिसत आहे. प्रशासनाकडून रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले जात आहे. वारे अधिक असल्याने आग अधिक पसरताना दिसत आहे.  दोन फ्लॅटला आग लागल्याची माहिती आहे. ही आज 12 व्या मजल्यावर लागल्याने अग्निशमन दलाला थोड्या समस्या येत आहेत.

हा फ्लॅटमध्ये नक्की किती लोक आहेत, याबाबत माहिती मिळत नाहीये. बाजूच्या फ्लॅटमध्ये पीजी असल्याचीही माहिती पुढे येतंय ज्यामुळे काही लोक अडचण्याची शक्यता आहे. आगीची माहिती मिळताच इमारतीमधील लोकांनी रिकाम्या जागेत धाव घेतली. या आगीच्या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ही आग नक्की कशी लागली, याबाबत काही माहिती पुढे येऊ शकत नाहीये. मात्र, आग ज्यापद्धतीने भडकली आणि त्यानुसार स्पष्ट होते की, पूर्ण फ्लॅट जळून खाक झाला. दिल्ली-एनसीआरमध्ये आगीच्या घटना एका मागून एक सुरू आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे. सतत आगीच्या घटना सुरू आहेत. आग लागल्याची माहिती मिळताच बचावकार्य राबवण्यात आले. अग्निशमन दलासोबतच पोलिसही मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित आहेत.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा