AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ममता बॅनर्जींचा दारुण पराभव करणाऱ्या ‘त्या’ भाजप नेत्याचं शिक्षण जाणून व्हाल हैराण

निवडणुकींचा निकाल लागल्यानंतर छोटे - मोठे बदल अपेक्षीत असतात. पण बंगालमध्ये भाजपने ममता बॅनर्जीला जोर का धक्का दिला आहे. सोमवारी निवडणुकीचा निकाल लगला आणि फक्त सत्ताच पलटली नाही तर, एक इतिहास घडला आहे... भाजपच्या नेत्याने ममता बॅनर्जींचा दारुण पराभव केला. जाणून घ्या त्यांचं शिक्षण...

ममता बॅनर्जींचा दारुण पराभव करणाऱ्या 'त्या' भाजप नेत्याचं शिक्षण जाणून व्हाल हैराण
Mamata Banerjee
| Updated on: May 05, 2026 | 10:28 AM
Share

4 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागला आणि ममता बॅनर्जी यांना मोठा धक्काच बसला. जो मतदार संघ ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला होता, तेथेत त्यांचा दारुण पराभव झाला आहे. अशात बंगालमध्ये फक्त सत्ता उलटली नाही तर, नवीन इतिहास घडला आहे. भाजपच्या शुभेंदु अधिकारी यांनी ममता यांचा पराभव केला आहे. सांगायचं झालं तर, 4 मे रोजी असं काही घडलं ज्याचा कोणी विचार देखील केला नसेल. मेदिनीपूर येथील शुभेंदु अधिकारी यांनी फक्त स्वतःट गड वाचवला नाही तर, त्यांनी भवानीपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा थेट पराभव करून संपूर्ण देशाला धक्का दिला. आता फक्त एकच चर्चा रंगली आहे आणि ती म्हणजे दादाच आता बंगालचे पुढचे मुख्यमंत्री होणार का?

शिक्षणात अव्वल आहेत शुभेंदु अधिकारी

राजकीय रिंगणात विरोधांवर मात करणारे शुभेंदु अधिकारी शिक्षणात देखील अव्वल आहे. शुभेंदु अधिकारी यांनी मेदिनीपूरमधील स्थानिक शाळांमध्ये आपलं प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यांनी 1987 मध्ये कांथी मॉडेल स्कूलमधून उच्च माध्यमिक म्हणजेच 12 वीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन जीवनात प्रवेश केला.

ग्रेज्युएशन आणि मास्टर्स…

शुभेंदु अधिकारी त्यांचं ग्रेज्युएशनचं शिक्षण पी.के. कॉलेज येथून घेतलं. पण त्यांनी शिक्षण याठिकाणी थांबवलं नाही. शुभेंदु अधिकारी यांना शिक्षणाची आवड इतकी होती की, त्यांनी कोलकाता येथील नामांकित रवींद्र भारती विद्यापीठात शिक्षण घेतलं, जिथे त्यांनी एम.ए. पदवी मिळवली. याचा अर्थ, राजकीय प्रवास सुरु करण्यापूर्वी त्यांना कलांचं सखोल ज्ञान होतं

शुभेंदु अधिकारी यांच्याकडून ममता बॅनर्जींचा दारुण पराभव

शुभेंदु अधिकारी यांनी भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा 15 हजार 105 मतांनी पराभव केली. हा विजय फार मोठी गोष्ट आहे, कारण भवानीपूर मतदारसंघ ममता बॅनर्जींचा मानला जात होता… या विजयानंतर शुभेंदु अधिकारी यांना मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे… पण भाजप सध्या त्यांच्या विजयाला बंगालचा ऐतिहासिक विजय म्हणून साजरा करत आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ममता बॅनर्जी यांनी 15 वर्षांची सत्ताच गमावली असे नाही. तर त्यांचा हुकमी एक्का भवनीपूर मतदारसंघही त्यांना गमवावा लागला. यंदाच्या निवडणुकीत त्यांचा मतदारसंघ तर गेलाच, पण राज्यातही त्यांच्या पक्षाचा दारूण पराभव झाला.

Follow Us
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिय
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; थेट अमित शाह...
निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात!
Omraje Nimbalkar | निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात! अनिल देसाईंच्या त्या विधानाने महाराष्ट्रात खळबळ
ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील मातोश्रीवर, राजकारणात मोठं घडणार?
Omraje Nimbalkar | ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील अचानक 'मातोश्री'वर, राजकारणात मोठं घडणार?
मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
Omraje Nimbakakar | मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
दुर्दैव! हायकोर्टात जाणार... निंबाळकर निकालावर ओमराजेंची प्रतिक्रिया
दुर्दैव! हायकोर्टात जाणार...पवनराजे निंबाळकर निकालावर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला
मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला... पवनराजे निंबाळकर प्रकरणात कायदेतज्ज्ञ काय म्हणाले?
20 वर्षांनंतरचा निकाल! माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही; सर्व आरोपी..
मोठी बातमी! 20 वर्षांनंतरचा निकाल! माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही; पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपी निर्दोष
1 रुपया देतात, 100 रुपये काढतात, ठाकरेंकडून लाडकी बहीण योजनेची पोलखोल
Raj Thackeray | 1 रुपया देतात, 100 रुपये काढतात, राज ठाकरेंकडून लाडकी बहीण योजनेची पोलखोल; सरकारची पिसेच काढली
निकालाचे वाचन; इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमाध्ये... पवनराजे निंबाळकर प्रकरण
Video | निकालाचे वाचन; इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमाध्ये... पवनराजे निंबाळकर प्रकरणात नेमकं काय घडलं?
एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय... नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता..
एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय... नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता... राज ठाकरेंचा मोठा दावा