AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ममता बॅनर्जींच्या पक्षात उभी फूट? तब्बल 59 आमदार…बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ; नेमकं काय घडतंय?

आता बंगाल विधानसभेचे अध्यक्ष रथींद्र बोस हे विधानभवनात पोहोचले आहेत. बंडखोर आमदार लवकरच त्यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ऋतब्रत बॅनर्जी यांनाच विरोधी पक्षनेता करावे, अशी मागणी तृणमूलचे बंडखोर आमदार करू शकतात.

ममता बॅनर्जींच्या पक्षात उभी फूट? तब्बल 59 आमदार...बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ; नेमकं काय घडतंय?
mamata banerjeeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 03, 2026 | 3:44 PM
Share

West Bengal TMC MLA Revolt : पश्चिम बंगालमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हातातून सत्ता गेल्यानंतर त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पक्षात उभी फूट पडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पक्षातील 80 आमदारांपैकी तब्बल 59 आमदार हे बंडाच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता ममता बॅनर्जी यांचे टेन्शन वाढले आहे.

तृणूलमध्ये नेमकं काय घडत आहे?

मिळालेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी यांनी हकालपट्टी केलेल्या आमदार ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपन साहा यांच्या पाठीशी एकूण 59 आमदार उभे ठाकले आहेत. ऋतब्रत बॅनर्जी यांना एकूण 59 आमदारांचे समर्थन असून ते लवकरच विरोधी पक्षनेते होण्याची शक्यता आहे. सत्तेतून दूर होताच आमदारांमध्ये बॅनर्जी यांच्याविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळेच बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षात उभी फूट पडण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांनी ऋतब्रत बॅनर्जी यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर ते विधानसभेत दाखल झाले आहेत. त्यानंतर तृणमूलचे 20 आमदारदेखील विधानसभेत पोहोचले आहेत. त्यामुळेच आता लवकरच काहीतरी मोठं घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बंडखोर आमदारांची नेमकी मागणी काय?

तृणमूल काँग्रेसमधील सध्याच्या परिस्थितीवर बंडखोर आमदारांत सामील झालेले मुस्तफिजुर रहमान यांनी सविस्तर सांगितले आहे. आम्ही बंडखोरी केलेल्या 59 आमदारांनी अद्याप विरोधी पक्षनेत्याच्या प्रस्तावावर सही केलेली नाही. परंतु एखाद्या वरिष्ठ नेत्याला विरोधी पक्षनेता करावे, असे आमचे मत आहे, असे रहमान यांनी सांगितले आहे.

लवकरच बंडखोर आमदार करणार मागणी

दरम्यान, आता बंगाल विधानसभेचे अध्यक्ष रथींद्र बोस हे विधानभवनात पोहोचले आहेत. बंडखोर आमदार लवकरच त्यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ऋतब्रत बॅनर्जी यांनाच विरोधी पक्षनेता करावे, अशी मागणी तृणमूलचे बंडखोर आमदार करू शकतात. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय घडणार? ममता बॅनर्जी ही संभाव्य फूट रोखणार का? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात