AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीएमसीचा हा नेता ठरणार ममता बॅनर्जींसाठी एकनाथ शिंदे… अख्खा पक्षच फोडणार, चिन्ह आणि नावही…

TMC Crisis : TMC चे 80 पैकी तब्बल 50 आमदार बाहेर पडून स्वतंत्र गट स्थापन करू शकतात अशी माहिती समोर आला आहे. इतकेच नव्हे तर हा बंडखोर गट TMC च्या निवडणूक चिन्हावरही दावा करू शकतो.

टीएमसीचा हा नेता ठरणार ममता बॅनर्जींसाठी एकनाथ शिंदे... अख्खा पक्षच फोडणार, चिन्ह आणि नावही...
Mamata Banerjee tmc crisisImage Credit source: Google
| Updated on: Jun 02, 2026 | 9:48 PM
Share

पश्चिम बंगालमध्ये अलिकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 15 वर्षे सत्तेत राहिलेल्या टीएमसीचा पराभव झाला आहे. त्यानंतर आता पक्षाच्या अस्तित्वावरच संकटाचे ढग दाटू लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. TMC चे 80 पैकी तब्बल 50 आमदार बाहेर पडून स्वतंत्र गट स्थापन करू शकतात अशी माहिती समोर आला आहे. इतकेच नव्हे तर हा बंडखोर गट TMC च्या निवडणूक चिन्हावरही दावा करू शकतो, अशीही चर्चा रंगली आहे. याचे कारण म्हणजे विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीवेळी बनावट स्वाक्षरी प्रकरणावरून पक्षाने ऋतब्रता बॅनर्जी आणि संदिपन साहा या दोन आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर ही चर्चा रंगली आहे.

टीएमसीच्या आमदारांमध्ये फूट

दोन आमदारांच्या निलंबनानंतर ऋतब्रत बनर्जी यांच्या नेतृत्वाखालील आमदारांचा मोठा गट ममता बॅनर्जी यांच्या बैठकींपासून दूर राहू लागला आहे. मंगळवारी (2 जून) कोलकात्यात ममता बॅनर्जी यांनी आयोजित केलेल्या आंदोलनातही बहुतांश आमदार अनुपस्थित होते. तिथे फक्त सहा आमदार आणि तीन खासदार उपस्थित होते. दुसरीकडे बंडखोर गट गुप्त बैठका घेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पक्षातील मधील बंडखोरीच्या चर्चांना अधिकच हवा मिळाली आहे.

बंगालमधील या राजकीय परिस्थितीची तुलना शिवसेनेतील फुटीशी केली जात आहे. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेना फोडली होती आणि पक्षाच्या चिन्हावरही दावा केला होता. आता तृणमूलचे चे निलंबित राष्ट्रीय प्रवक्ते रिजू दत्ता यांनी इंडिया टुडेला सांगितले की, बंडखोर गट TMC पक्षावर आणि निवडणूक चिन्हावर दावा करण्याचा प्रयत्न करू शकतो.

विरोधी पक्षनेते पदावरून वादाची सुरुवात

हा वाद विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीपासून सुरू झाला. TMC मधील अनेक नव्याने निवडून आलेल्या आमदारांची इच्छा होती की पश्चिम बंगाल विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी ऋतब्रत बनर्जी यांची नियुक्ती व्हावी. मात्र, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षश्रेष्ठींनी शोभनदेव चट्टोपाध्याय यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. त्यानंतर अभिषेक बॅनर्जी यांनी विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रावर ऋतब्रत बनर्जी आणि संदीपन साहा यांच्या स्वाक्षऱ्या नव्हत्या. याबाबत त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर दोघांना पक्षातून काढून टाकण्यात आले. आता हाच गट स्वतंत्र भूमिका घेत असल्याचे दिसत आहे.

हे दोन नेते करू शकतात बंड

रविवारी ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीत पक्षाचे 80 पैकी 60 आमदार अनुपस्थित राहिल्याने बंडखोरीच्या चर्चांना अधिक पुष्टी मिळाली आहे. त्यामुळे दोन-तृतीयांश आमदार एकत्र होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ऋतब्रत बनर्जी आणि संदीपन साहा यांनी कोलकात्यातील आमदार निवासस्थानी TMC च्या अनेक आमदारांशी बैठक घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या दोन्हीपैकी एका नेत्याच्या नेतृत्वात हे आमदार नवा गट स्थापन करून पक्षावर आणि चिन्हावर दावा करू शकतात.

Follow Us
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी