ममता बॅनर्जी पुन्हा ओडिशाला जाणार; एकसुद्धा अपघातग्रस्त मदतीविना वंचित राहणार नाही…

ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, या भीषण अपघातात हातपाय गमावलेल्यांच्या कुटुंबीयांनाही सरकारी नोकऱ्या देण्यात येणार आहेत.

ममता बॅनर्जी पुन्हा ओडिशाला जाणार; एकसुद्धा अपघातग्रस्त मदतीविना वंचित राहणार नाही...
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 12:50 AM

नवी दिल्लीः  बालासोर रेल्वे दुर्घटनेवरून जोरदार राजकारण सुरु असतानाच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा ओडिशाला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ममता बॅनर्जी यांनी सांगितले की,त्या बुधवारी पुन्हा कटक आणि भुवनेश्वरला जाणार आहेत. यावेळी त्यांनी सांगितले की, बुधवारी आम्ही ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचे धनादेश आणि नोकरीची पत्रेही सुपूर्द करणार आहोत.

प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, सीबीआय चौकशीबाबत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकाल दिला आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, सीबीआय संबंधित गुन्हेगाऱ्यांचा तपास सुरु आहे.

मात्र हा रेल्वे विभागाचा प्रश्न आहे असला तरी या अपघाताची सर्व माहिती नागरिकांना कळणे गरजेचे आहे असंही त्यांनी यावेळी सांगितेल. कोणत्याही परिस्थितीत या प्रकरणातील सत्य लपवले जाऊ नये असंही त्यांनी यावेळी सांगितले.

ममता बॅनर्जी यांनी यावेळी सांगितले की, या अपघातातील नागरिकांना मला मदत करायची आहे. तसेच अनेक मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही.त्यामुळे त्या 106 मृतदेहांची ओळक निश्चित करायची आहे. तर अनेक जखमींना उपचारासाठीही मदत करायची आहे.

त्यांनी सांगितले की, सध्या पश्चिम बंगालमधील 206 जखमी प्रवाशांना ओडिशातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तर कटकमधील रुग्णालयात 33 प्रवासी गंभीर आहेत. तर बंगालचे काही मंत्री आणि अनेक वरिष्ठ अधिकारीही त्यांच्यासोबत ओडिशात जाणार असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे आहेत.

तसेच ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, या भीषण अपघातात हातपाय गमावलेल्यांच्या कुटुंबीयांनाही सरकारी नोकऱ्या देण्यात येणार आहेत.

तसेच सरकार कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये बसलेल्या आणि सध्या मानसिक आणि शारीरिक आघात झालेल्यांना आर्थिक मदतही जाहीर करणार आहे.

Non Stop LIVE Update
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.