बंगालमध्ये ममता विरुद्ध सीबीआय, ममता बॅनर्जींचं धरणं आंदोलन

कोलकाता : पोलीस आयुक्तांच्या घरी छापा टाकण्यास गेलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, आता त्या पाच अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या मोदी सरकार विरोधात धरणे आंदोलनावर बसल्या आहेत. त्यामुळे सध्या देशात मोदी विरुद्ध ममता बॅनर्जी असे चित्र आहे आणि आता या …

बंगालमध्ये ममता विरुद्ध सीबीआय, ममता बॅनर्जींचं धरणं आंदोलन

कोलकाता : पोलीस आयुक्तांच्या घरी छापा टाकण्यास गेलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, आता त्या पाच अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या मोदी सरकार विरोधात धरणे आंदोलनावर बसल्या आहेत. त्यामुळे सध्या देशात मोदी विरुद्ध ममता बॅनर्जी असे चित्र आहे आणि आता या वादात इतर नेत्यांनीही उडी घेण्यास सुरुवात केली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या समर्थनात उतरले आहेत, तर अरंविंद केजरीवाल हे उद्या सोमवारी ममताजींना भेटायला जाण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?

कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी शारदा चिटफंड प्रकरणी छापा टाकण्यास गेलेल्या सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि महापौर फिरहाद हकीम हे पोलीस आयुक्तांच्या घरी जाऊन याबाबत चर्चा केली, त्यांच्यामते हे सर्व पंतप्रधान मोदींचे षडयंत्र असल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.

काहीच महिन्यांपूर्वी पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश सरकारने परवानगीशिवाय सीबीआय अधिकाऱ्यांना छापेमारी करण्यास मनाई केली होती. मात्र आता चक्क सीबीआयच्या अधिकाऱ्यांनाच अटक करण्यात आल्याने राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधील वाद चिघळण्याची शक्यता आहे. आता त्या अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती आहे.

रविवारी सायंकाळी सीबीआयचे अधिकारी रोज व्हॅली आणि शारदा चिट फंड घोटाळा प्रकरणी तपासाकरीता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी पोहोचले, मात्र त्यांना बाहेरच अडवण्यात आले. एसआयटी टीमचे नेतृत्व करत असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याने कागदपत्र आणि फाइल्स गमावल्याबद्दल तपास करण्यासाठी सीबीआयचे अधिकारी आयुक्तांच्या घरी पोहोचले होते. याबाबत त्यांना नोटीसही पाठवण्यात आली होती, मात्र त्याचे काहीही उत्तर आले नाही. दुसरीकडे, अधिकाऱ्यांजवळ वॉरंट नव्हता म्हणून त्यांना थांबवण्ययात आल्याचे, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, संपूर्ण देश मोदी-शाहांमुळे त्रस्त आहे. देशात सध्या आणीबाणीपेक्षाही वाईट परिस्थिती आहे. मोदी सरकारच्या या वृत्ती विरोधात त्या धरणे आंदोलनावर बसल्या आहेत. त्यांच्यासोबत पोलीस आयुक्त राजीव कुमार हे देखील धरणे आंदोलनावर बसले आहेत. सध्या मोदी विरुद्ध ममता हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *