AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गळ्यात विषारी साप टाकून बाईकवर निघाला, Reel बनवण्याच्या नादात त्याने…

मध्य प्रदेशात एका सर्पमित्राला साप चावला, त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तो चक्क साप गळ्यात घालून आपल्या मुलाला बाईकवरून शाळेतून घेऊन जात होता. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही समोर आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

गळ्यात विषारी साप टाकून बाईकवर निघाला, Reel बनवण्याच्या नादात त्याने...
विषार साप गळ्यात घालून रील बनवणं पडलं महागातImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jul 16, 2025 | 1:02 PM
Share

मध्य प्रदेशातील गुणा येथील राधोगड येथील एका माणसाला रील्स बनवणे महागात पडले आणि त्याचा अतिशय वेदनादायक मृत्यू झाला. धक्कादायक गोष्ट म्हणजे तो गळ्यात साप घेऊन रील्स बनवत होता. त्याच दरम्यान, सापाने त्याला दंश केला आणि त्याचा मृत्यू झाला. तो साप पकडायचं काम करायचा पण त्याचा सापामुळे त्याचा मृत्यू झाला. तो माणूस जेव्हा साप पकडून घरी जात होता, तेवढ्यात त्यावा मुलाच्या शाळेतून फोन आला. म्हणून त्याने साप आपल्या गळ्यात घातला आणि तो माणूस बाईकवरून शाळेकडे निघाला. पण वाटेत सापाने त्याला दंश केल्यानेच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

राधोगडच्या बरबतपुरा गावातून ही घटना समोर आली आहे, जिथे साप पकडणारा दीपक महावर याचा मृत्यू झाला. त्याला भारसुला परिसरातील सिलीपुरा गावात साप असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर तो साप पकडण्यासाठी तिथे पोहोचला. त्याने गावातून सापाला वाचवलं आणि साप पकडल्यानंतर दीपक परत चालला होता. मात्र तेवढ्यातच, दीपकला त्याच्या मुलाच्या शाळेतून फोन आला.

उपचारानंतरही मृत्यू

अखेर दीपकने तो साप आपल्या गळ्यात टाकला आणि एक रील बनवली. मग घाईघाईत तो आपल्या मुलाला घेण्यासाठी बाईकवरून शाळेला निघाला. यादरम्यान वाटेत सापाने दीपकच्या हाताला दंश केला घेतला. त्याच्या एका मित्राच्या मदतीने तो राधोगड येथील रुग्णालयात पोहोचला. उपचारानंतर त्याला बरं वाटलं आणि तो घरी परत आला. पण रात्री त्याची प्रकृती अचानक पुन्हा बिघडली. त्याच्या कुटुंबियांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

दीपक जेव्हा त्याच्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी बाईकवरून घेऊन जाणार होता, तेव्हा एकाने त्याच्या गळ्यात साप पाहिला आणि त्याचा व्हिडिओ बनवला, जो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दीपक गळ्यात साप ठेवून घालून त्याच्याशी खेळताना एक व्हिडीओत दिसत आहे. तो वारंवार सापाच्या तोंडाला स्पर्श करतो. या सापाला कुठून वाचवलं,हेही त्याने व्हिडीओत सांगितलं, मात्र अखेरच त्याच सापाने त्याचा जीव घेतला.

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.