Manipur Big News : ‘ते लोक कपडे काढायला सांगत होते आणि पोलीस…’; मणिपूरमधील व्हायरल व्हिडीओ प्रकरणात मोठा ट्विस्ट!

मणिपूरमधील भीषण वास्तव लोकांच्या समोर आलं खरं पण ही घटना आताची नसून मे महिन्यात घडली होती. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे नराधमांनी दोन नाहीतर तीन महिलांना विवस्त्र केल्याची माहिती समोर आली आहे.

Manipur Big News : 'ते लोक कपडे काढायला सांगत होते आणि पोलीस...'; मणिपूरमधील व्हायरल व्हिडीओ प्रकरणात मोठा ट्विस्ट!
Follow us
| Updated on: Jul 21, 2023 | 9:02 PM

मुंबई : मणिपूरमधील दोन महिलांचा व्हिडीओ देशभर व्हायरल झाला आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे मणिपूरमधील भीषण वास्तव लोकांच्या समोर आलं खरं पण ही घटना आताची नसून मे महिन्यात घडली होती. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे नराधमांनी दोन नाहीतर तीन महिलांना विवस्त्र केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत त्यामधील एक पीडितेने  4 मेला नेमकं काय घडलं होतं? याबाबत मोठा खुलासा केला आहे.

4 मे ला नेमकं काय घडलं होतं?

मैतेई समाजाच्या लोकांनी फाइनोम गावावर तसा 3 मेलाच हल्ला केला होता. कारण त्या गावामध्ये कुकी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे.  3 मे रात्री 3 वाजता फाइनोम गावात घुसून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. मात्र कुकी समाजाच्या लोकांनी त्यांना हुसकावून माघारी परतवून लावलं होतं.

4 मेला रात्री मैतेई समाजातील जळपास 800 ते 1000 तरूण परत एकदा फाइनोम गावात घुसले. त्यांच्यातील प्रत्येकाच्या हातामध्ये लाकूड आणि हत्यारं होतीत. मैतेई समाजाने गावकऱ्यांवर हल्ला सुरू केला. त्यांची घरं जाळलीत सर्व लोक आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले. यामधील 5 जणांनी जंगलाच्या दिशेने पळायला सुरूवात केली, यात 3 महिला आणि 2 पुरूषांचा समावेश होता.

पाच कुकी समाजाच्या लोकांना नोंगपोक सेकमाई पोलीस स्टेशनच्या टीमने त्यांना गाडीमध्ये घेतलं. मात्र पुढे गेल्यावर त्यांना मैतेई समाजाच्या लोकांनी अडवलं आणि गाडीमधून पाचही जणांना बाहेर काढलं. पोलीस त्यांना वाचवतील असं वाटलं पण तसं काही झालं नाही. त्यातील 53 वर्षीय पीडितने सांगितल की, रात्रीपासूनच आम्ही घाबरलो होतो आणि परत सकाळी झालेल्या या हल्ल्यामुळे आम्ही जंगलाच्या दिशेने पळत गेलो होतो.

23 वर्षीय पीडितने सांगितलं की, आम्ही पोलिसांच्या गाडीमध्ये होतो त्यामुळे सुरक्षित होतो असं वाटलं होतं. मात्र पोलिसांनी मैतेई समाजाच्या लोकांमध्ये आम्हाला सोडलं, आम्हाला बाहेर सोडल्यावर घोळक्यामध्ये असलेल्या लोकांनी आम्हाला जर जिवंत राहायचं असेल तर अंगावरील कपडे काढ अशी धमकी दिली. पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही अखेर आम्ही कपडे काढल्याचं तिने सांगितलं.

जे दोन पुरूष होते त्यातील एक 56 वर्षाच्या व्यक्तिला मारलं आणि त्यानंतर दुसरा 19 वर्षीय तरूण मुलगा ज्याने प्रतिकार केला तर त्यालाही संपवण्यात आलं. दोघांना मारल्यावर जमावाने तिघींना कपडे काढायला भाग पाडलं आणि त्यांचा व्हिडीओ शुट करण्यात आला. मात्र यामधील फक्त दोघी व्हिडीओमध्ये दिसल्या होत्या. पण प्रत्यक्षात तिघींना विवस्त्र करण्यासाठी भाग पाडलं गेलं होतं.

दरम्यान, 19 जुलैला त्या दोन महिलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सगळीकडे खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी आम्ही आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती दिली.

Non Stop LIVE Update
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....