AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंगाला लग्नाची हळद लागताच क्षणात तिचं शरीर..ज्या दिवशी निघणार होती डोली, त्याच दिवशी निघाली तिची अंत्ययात्रा, सगळेच शॉकमध्ये

नवरा दिगंबर नाथ दुसर्‍या गावात होता. त्याला मुलीच्या घरातील उष्टी हळद लागली नव्हती. म्हणून तो वाचला. 26 एप्रिलला राखीची डोली उठणार होती. सात फेरे घेऊन ती नवीन घरात जाणार होती.

अंगाला लग्नाची हळद लागताच क्षणात तिचं शरीर..ज्या दिवशी निघणार होती डोली, त्याच दिवशी निघाली तिची अंत्ययात्रा, सगळेच शॉकमध्ये
Rakhi Turmeric ritual reaction
| Updated on: May 15, 2026 | 9:11 AM
Share

घरात लग्नाचा आनंद, उत्साह होता. नातेवाईक, पाहुणे मंडळी घरी आलेली. लग्नाची तयारी जोरात सुरु होती. गजु नाथचं घर आनंदाने भरलेलं. मोठी मुलगी राखीचं लग्न होणार होतं. ती 22 वर्षांची होती. वेळेत लग्न होत असल्याने सर्व कुटुंबीय आनंदात होते. 24 एप्रिलला हळदी सोहळ्याच्या वेळी राखी खूप आनंदात होती. ढोलकीच्या थापेवर तिचा डान्स सुरु होता. तेव्हा कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल की, हा आनंद फक्त काही तासांचा आहे. मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातील कसरावद नगरची ही घटना आहे. राखीचं लग्न खामखेडा येथे राहणाऱ्या दिगंबर नाथ बरोबर ठरलेलं. 24 एप्रिलच्य संध्याकाळी राखीला जशी हळद लावली. लगेच तिला रिएक्शन सुरु झालं. अगदी काही वेळातच राखीचा गळा, ओठ सुजले. तिचा आवाज बंद झाला, असं नातेवाईकांनी सांगितलं.

आई-वडिल या प्रकाराने घाबरले. काय होतय हेच त्यांना कळत नव्हतं. घाबरलेले नातेवाईक राखीला जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. तिला लगेच इंदूर येथे घेऊन जाण्यास सांगितलं. जिल्हा रुग्णालयाने रुग्णवाहिका सुद्धा दिली नाही असा राखीच्या नातेवाईकांचा आरोप आहे. त्यानंतर वडिलांनी पदरचे 4000 रुपये खर्च केले व तिला खासगी रुग्णवाहिकेने इंदूरच्या MYH रुग्णालयात घेऊन गेले.

वाटेतच राखीने प्राण सोडले

25 एप्रिलला MYH रुग्णालयात उपचार सुरु असताना गजु नाथ यांनी मुलीचं लग्न असल्याचं सांगितलं. त्यांनी मुलीला प्रायवेट रुग्णालयात नेण्याची इच्छा व्यक्त केली. राखीला खासगी रुग्णालयात नेलं. तिथे उपचाराचा खर्च 2 ते 3 लाख रुपये असल्याचं सांगितलं.आर्थिक दृष्ट्‍या तितकी ताकद नसल्याने ते मुलीला पुन्हा सरकारी रुग्णालयात घेऊन येते होते. वाटेतच राखीने प्राण सोडले.

ती खूप आनंदात होती, नाचत होती

मुलीचे वडिल गजु भाई बोलले की, “हळदी विकायला आलेल्या माणसाकडून आम्ही हळद घेतली. जवळपास 10-15 जणांनी माझ्या राखीला हळद लावली. पण तिला रिएक्शन झालं. ती खूप आनंदात होती. नाचत होती. माझ्या वाट्याला जे दु:ख आलं, ते दुसऱ्या कुठल्या कुटुंबाच्या वाट्याला येऊ नये”

म्हणून तो वाचला

26 एप्रिलला राखीची डोली उठणार होती. सात फेरे घेऊन ती नवीन घरात जाणार होती. त्याच दिवशी वडिलांना तिची अर्थी उचलावी लागली. नवरा दिगंबर नाथ दुसर्‍या गावात होता. त्याला मुलीच्या घरातील उष्टी हळद लागली नव्हती. म्हणून तो वाचला. राखीच्या कुटुंबातील तिची आई सीताबाई, भाऊ लवकुश आणि दोन लहान बहि‍णींची रडून रडून वाईट अवस्था आहे.

Follow Us
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात