AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरी सुरु होती लग्नाची तयारी, तितक्यात बातमी आली मुलगा झाला शहीद

लष्करात असलेल्या जवानाचं कधी बरं वाईट होईल हे सांगता येत नाही. आपल्या देशासाठी तो सदैव तत्पर असतो. देशाच्या संरक्षणासाठी जीवाची बाजी लावतो. आजपर्यंत आपण अनेक घटना ऐकल्या आहेत. नुकताच लग्न झालेल्या जवान शहीद झाल्याच्या बातम्या अनेकदा कानावर येतात. यांच्या बलिदानाला विसरता कामा नये.

घरी सुरु होती लग्नाची तयारी, तितक्यात बातमी आली मुलगा झाला शहीद
gautam kumar
| Updated on: Dec 23, 2023 | 7:04 PM
Share

मुंबई : जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील बाफलियाज येथे एक जवान शहीद झाला. शहीद झालेल्या जवानाचे नाव गौतम कुमार आहे. ते रायफलमन होते. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या घरी गौतमचं लग्न ठरल्यामुळे आनंदाचं वातावरण होतं आणि घरातील लोकं त्याच्या लग्नाच्या तयारीत होते. परंतू त्याआधीच कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. 30 सप्टेंबर रोजी गौतमचे लग्न ठरले होते आणि 11 मार्चला त्याचे लग्न होणार होते. घरात सगळे आनंदी होते पण या दरम्यानच दुखाची बातमी आली.

2014 मध्ये  लष्करात भरती

शहीद गौतम कुमार यांच्या भावाने त्यांच्याबद्दल माहिती दिली. राहुल कुमार यांनी म्हटले की, 2014 मध्ये गौतम कुमार लष्करात भरती झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून ते पुंछ सेक्टरमध्ये तैनात होते.

1 डिसेंबर रोजी ते आपल्या घरी आले होते. त्यानंतर सुट्ट्या संपवून 16 डिसेंबरला ते पुन्हा कर्तव्यावर गेले. सप्टेंबरमध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता. संपूर्ण कुटुंब लग्नाची जय्यत तयारी करत होते. पण त्याआधीच शोककळा पसरली. गुरुवारी रात्री लष्कराच्या अधिकाऱ्यांनी गौतम कुमार शहीद झाल्याची बातमी सांगितली. या घटनेनंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

दोन वर्षांपूर्वीच वडिलांचे निधन

गौतम कुमार यांच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले होते. गौतम कुमार हे चार भावंडे आहेत. ज्यामध्ये गौतम कुमार हे सर्वात लहान होते. त्यांना दोन बहिणी आहेत. त्यांचा विवाह झाला आहे. भाऊ राहुल कुमार देखील शिक्षण विभागात कार्यरत आहेत.

गौतम कुमार शहीद झाल्याची बातमी कळताच संपूर्ण गावावर एकच शोककळा पसरली आहे. शहीद झाल्याची बातमी कळताच लोकं त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी येत आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.