AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जम्मू काश्मीरची पहिली ‘फायटर पायलट’ माव्या सूदन हवाई दलात रुजू, माझी लेक देशाची मुलगी बनली, वडील भावूक

कायम अशांत असणाऱ्या जम्मू काश्मीरसाठी हा एक गौरवाचा क्षण आहे. कारण, इथली एका 23 वर्षीय मुलगी भारतीय हवाई दलात 'फायटर पायलट' म्हणून रुजू झालीय.

जम्मू काश्मीरची पहिली 'फायटर पायलट' माव्या सूदन हवाई दलात रुजू, माझी लेक देशाची मुलगी बनली, वडील भावूक
माव्या सूदन
| Edited By: | Updated on: Jun 23, 2021 | 12:03 AM
Share

जम्मू काश्मीर: कायम अशांत असणाऱ्या जम्मू काश्मीरसाठी हा एक गौरवाचा क्षण आहे. कारण, इथली एका 23 वर्षीय मुलगी भारतीय हवाई दलात ‘फायटर पायलट’ म्हणून रुजू झालीय. यासोबतच, माव्या सूदन ही जम्मू काश्मीरची पहिली ‘महिला फायटर पायलट’ बनलीय. तर माव्या ही देशाची 12 वी महिला फायटर पायलट ठरलीय. (Mavya Sudan first woman IAF fighter pilot from Jammu and Kashmir)

माव्या राजौरीच्या लंबेडी गावची रहिवासी

माव्या ही दहशतवादी घटनांसाठी अनेकदा चर्चेत येणाऱ्या राजौरी इथल्या लंबेडी गावाची रहिवासी आहे. जम्मूच्या कार्मल कॉन्व्हेन्ट स्कूलमधून तिनं आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर चंदीगडमधल्या ‘डीएव्ही’मधून तिनं ‘राज्यशास्र’ विषयातून पदवी प्राप्त केली. माव्यानं गेल्या वर्षीच भारतीय हवाई दलाची प्रवेश परीक्षा पास केली होती.

माव्या देशाची मुलगी बनली

आपल्या मुलीनं अवकाशाला घातलेल्या गवसणीनं फ्लाईंग ऑफिसर माव्या सूदन हिचे वडील विनोद सूदन हे खूपच आनंदी आहेत. ‘आज मी खूपच आनंदी आहे. आता ती केवळ माझीच नाही तर संपूर्ण देशाची मुलगी बनलीय. एका मुलीच्या वडिलांसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे’ अशी प्रतिक्रिया विनोद सूदन यांनी व्यक्त केली. तर, ‘माझी छाती अभिमानानं फुलून आलीय. माव्याला तिच्या मेहनतीचं फळ मिळालंय’, अशी प्रतिक्रिया माव्याची आई सुषमा सूदन यांनी व्यक्त केली.

हैदराबादमध्ये पासिंग आऊट परेड

हैदराबादच्या डुंडिगल हवाईदल अकादमीत शनिवार पार पडलेल्या ‘पासिंग आऊट परेड’मध्ये माव्या एकमेवर महिला फायटर पायलट ठरली. भारतीय हवाई दलात माव्याला ‘फ्लाईंग ऑफिसर’ म्हणून नियुक्त करण्यात आलंय. या दरम्यान वायुसेना प्रमुख आर के एस भदौरिया हेदेखील उपस्थित होते.

2016 मध्ये बिहारच्या भावना कंठ यांना हवाईदलात पहिली फायटर पायलट महिला होण्याचा मान मिळाला होता. त्यानंतर अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंह यादेखील फायटर पायलट म्हणून रुजू झाल्या होत्या.

संबंधित बातम्या:

ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही : राम शिंदे

नंदूरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक जाहीर, मतदान आणि निकाल कधी? वाचा एका क्लिकवर

(Mavya Sudan first woman IAF fighter pilot from Jammu and Kashmir)

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.