अहमदाबाद : भारताने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतलीय. मेघा इंजिनियरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने (Megha Engineering Infrastructure Limited – MEIL) अहमदाबादमध्ये समुद्रातून खनिज तेल उत्खननासाठी उपयोगात येणाऱ्या रिग्ज (Rigs) स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करुन निर्मिती केलीय. एमईआयएलच्या या नव्या यशामुळे भारताचं मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताचं उद्दिष्ट पूर्ण करण्यास मोठा हातभार लागणार आहे. बुधवारी (25 ऑगस्ट) अहमदाबादमध्ये एमईआयएलने पहिली स्वदेशी Rigs चं तेल उत्पादक सरकारी कंपनी ओएनजीसीला (ONGC) हस्तांतरण केलं. भारतासाठी तंत्रज्ञान स्वालंबनात ही मोठी उपलब्धता मानली जात आहे.