AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अमेरिकेत मोठा भूकंप, डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का, अमेरिकन सैन्यांची बंडखोरी, थेट…

अमेरिकेनं काही दिवसांपूर्वी व्हेनेझुएलावर हल्ला केला होता, निकोलस मादुरो यांना अटक केली, त्यानंतर आता अमेरिकेमधून एक मोठी बातमी समोर येत असून, यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे.

मोठी बातमी! अमेरिकेत मोठा भूकंप, डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का, अमेरिकन सैन्यांची बंडखोरी, थेट...
donald trump Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 11, 2026 | 4:51 PM
Share

अमेरिकेनं काही दिवसांपूर्वी व्हेनेझुएलावर हल्ला केला होता, या हल्ल्यानंतर थेट व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अमेरिकेनं अटक केली. निकोल मादुरो यांना अटक करून अमेरिकेत आणण्यात आलं, यामुळे सध्या जगभरात वातावरण चांगलंच तापलं आहे, चीन आणि रशियानं अमेरिकेविरोधात उघड- उघड भूमिका घेतली आहे. निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीची तातडीनं सुटका करावी अशी मागणी चीनने अमेरिकेकडे केली आहे. दरम्यान व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला मोर्चा ग्रीनलँडकडे वळवला आहे. एवढा जागतिक दबाव असताना देखील डोनाल्ड ट्रम्प हे आता ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याचं स्वप्न पहात आहेत, साम, दाम दंड अशा सर्व प्रकारे डोनाल्ड ट्रम्प ग्रीनलँडवर अमेरिकेचा ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान त्यातच आता मोठी बातमी समोर आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर ताबा मिळवण्यासाठी आता अमेरिकेच्या सैन्यदलाला प्लॅन तयार करण्याचा आदेश दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी देखील अनेकदा ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याची धमकी दिली आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांना जबर धक्का बसला आहे. तो म्हणजे अमेरिकन सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाला विरोध केला आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार डोनाल्ड ट्रम्प याचे प्रमुख सल्लागार ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याची योजना तयार करत आहेत. व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर आता लगेच ग्रीनलँडकडे अमेरिकेनं मोर्चा वळवला पाहिजे असा सल्ला ट्रम्प यांच्या सल्लागारांनी त्यांना दिला आहे.

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार ट्रम्प यांनी अमेरिकेच्या जॉइंट स्पेशल ऑपरेशन्स कमांड फोर्सला (JSOC) ग्रीनलँडवर कारवाई करण्यासाठी योजना तयार करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या जॉइंट स्पेशल ऑपरेशन्स कमांड फोर्सच्या चीफने डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाला थेट विरोध केला आहे, असं करणं हे आंतरराष्ट्रीय नियम आणि कायद्याचं उल्लंघन होईल, तसेच अमेरिकन काँग्रेस देखील या कारवाईल पाठिंबा देणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

Follow Us
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल...
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; क्रीडा घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याचा दावा
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा...
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीचा गौरव
गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
Raj Thackeray : गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन..
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज..
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी...
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी करणार सण
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत्रांबाबत नेमकं काय म्हणाले तुकाराम मुंढे?
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद,
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद, नेमकं काय घडलं होतं?