ओडिशाहून दिल्ली एम्समध्ये विमानाने नेलेल्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू, मैत्रिणीला भेटण्यासाठी जात असतानाच….
पुरी जिल्ह्यात तीन हल्लेखोरांनी मैत्रिणीच्या घरी निघालेल्या मुलीवर हल्ला केला त्यानंतर तिच्यावर अत्याचा करत थेट 15 वर्षीय मुलीला जाळून टाकले. या धक्कादायक घटनेने राज्यात संतापाची लाट बघायला मिळाली. उपचार सुरू असतानाच आता मुलीचा जीव गेलाय.

ओडिशामध्ये एक अतिशय धक्कादायक अशी घटना घडलीये. पुरी जिल्ह्यात तीन हल्लेखोरांनी मैत्रिणीच्या घरी निघालेल्या मुलीवर हल्ला केला त्यानंतर तिच्यावर अत्याचा करत थेट 15 वर्षीय मुलीला जाळून टाकले. दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, पीडितेचा मृत्यू झाला. या घटनेने मोठी खळबळ उडालीये. 19 जुलैला सकाळी पुरी जिल्ह्यातील भार्गवी नदीच्या काठावर तीन अज्ञात पुरूषांनी मुलीचे अपहरण करून तिला जाळून टाकल्याचा आरोप आहे.
15 वर्षीय मुलीने सोडले प्राण एम्स रूग्णालयात घेतला शेवटचा श्वास
या घटनेनंतर बालंगा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये तिच्या आईने म्हटले आहे, अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेली होती. त्यानंतर तिच तीन लोकांनी अपहरण केले आणि तिच्या अंगावर ज्वलनशिल पदार्थ टाकून तिला जाळून दिले. धक्कादायक म्हणजे यादरम्यान ती मुलगी तब्बल 70 टक्के भाजली होती. या घटनेनंतर तिला लगेचच आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत व्यक्त केले दु:ख
पुढील उपचारासाठी तिला एम्स भुवनेश्वर येथे नेण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी विमानाने एम्स दिल्ली येथे नेण्यात आले, जिथे तिच्यावर काही शस्त्रक्रिया करण्यात आल्या. डॉक्टरांकडून तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आली. मात्र, शेवटी तिचा जीव गेलाय. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी मुलीच्या निधनानंतर एक पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केले आहे.
15 वर्षीय मुलगी मैत्रिणीला भेटण्यासाठी जात असताना घडली घटना
मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, बलंगा परिसरातील पीडितेच्या मृत्यूबद्दल ऐकून मला धक्का बसला आहे. सरकारच्या वतीने सर्व प्रयत्न करण्यात आली. दिल्लीतील एम्सच्या तज्ज्ञ वैद्यकीय पथकाच्या अहोरात्र प्रयत्नांना न जुमानता, तिचे प्राण वाचवता आले नाहीत, मी पीडितेच्या आत्म्याला शांती मिळो आणि तिच्या कुटुंबाला हे कधीही भरून न येणारे नुकसान सहन करण्याची शक्ती देवाने द्यावी, अशी मी प्रार्थना करतो, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
