AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअर इंडियाच्या ‘त्या’ विमानात किंवा हॉस्टेलमध्येही नव्हता, तरी फिल्ममेकरचा दुर्घटनेत मृत्यू

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळल्यापासून फिल्ममेकर महेश जिरावाला बेपत्ता होता. अखेर त्याचाही मृत्यू या विमान अपघातामुळे झाल्याचं सिद्ध झालं आहे. अपघाताच्या वेळी महेश त्याच्या स्कूटरवरून हॉस्टेलच्या जवळून जात होता.

एअर इंडियाच्या 'त्या' विमानात किंवा हॉस्टेलमध्येही नव्हता, तरी फिल्ममेकरचा दुर्घटनेत मृत्यू
air india plane crash
| Updated on: Jun 22, 2025 | 10:07 AM
Share

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेला चित्रपट निर्माता महेश जिरावालाच्या मृत्यूची अखेर पुष्टी झाली आहे. डीएनए चाचण्यांचा अहवाल जुळल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. 34 वर्षीय महेश हा अहमदाबाद दुर्घटनेपासून बेपत्ता होता. विशेष म्हणजे अपघाताच्या वेळी तो संबंधित एअर इंडियाच्या विमानात किंवा ते विमान ज्या हॉस्टेलवर कोसळलं त्यातही नव्हता. त्याच्या मोबाइलचं शेवटचं लोकेशन हॉस्टेलपासून 700 मीटर अंतरावर दिसून आलं होतं. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली होती.

12 जून रोजी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच एअर इंडियाचं AI 171 बोइंग 787-8 ड्रीमलायनर विमान अहमदाबादमधल्या मेघानी नगर इथल्या बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळलं होतं. ज्यावेळी हे विमान हॉस्टेलवर कोसळलं, त्याचवेळी महेश हॉस्टेलच्या जवळून त्याच्या दुचाकीवरून घरच्या दिशेने जात होता. सेक्टर 2 चे सह पोलीस आयुक्त जयपालसिंह राठोड यांनी सांगितलं की, डीएनए चाचणीद्वारे महेश जिरावाला यांचा मृत्यू विमान अपघातात झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

महेशचं निधन त्या अपघातात होऊ शकतं, यावर अजूनही त्याच्या कुटुंबीयांना विश्वास बसत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांची शंका दूर करण्यासाठी तो ज्या रस्त्यावर होता, तिथले सीसीटीव्ही फुटेज आणि जळालेल्या त्यांच्या स्कूटरचे पुरावे गोळा केले. “डीएनए चाचणीत त्याची ओळख पटल्यानंतर शुक्रवारी महेश जिरावालाच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. आगीत जळून खाक झालेली त्याची स्कूटरही अपघातस्थळाच्या जवळ सापडली. स्कूटरच्या इंजिनचं नंबरसुद्धा त्याच्या स्कूटरच्या नोंदणी कागजपत्रांशी जुळत होता”, असं राठोड यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

महेशचा छोटा भाऊ कार्तिक याविषयी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना म्हणाला, “तो गुरुवारी दुपारी 1.10 वाजताच्या सुमारास पत्नी हेतलशी फोनवर बोलला होता. लॉ गार्डनजवळील मिटींग संपल्याची माहिती त्याने पत्नीला दिली होती. फोनवर दोघांची थट्टामस्करीही झाली होती. त्यानंतर नरोडा इथल्या निवासस्थानाकडे निघत असल्याचं त्याने हेतलला सांगितलं होतं.” फोन केल्याच्या तासाभरानंतरही महेश घरी न परतल्याने हेतलने त्याचा नंबर डाएल केला. तेव्हा त्याचा फोन स्विच ऑफ असल्याचं समजलं. हेतलने त्याला सतत फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा नंबर स्वीच ऑफच येत होता.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.