उत्तराखंड भाजपमध्ये भूकंप, सहा आमदारांचा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश; काँग्रेस नेत्याचा दावा

उत्तराखंड भाजपमध्ये लवकरच भूकंप होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष गोविंद सिंह कुंजवाल यांनी येत्या पंधरा दिवसात भाजपचे सहा आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. (MLA Govind Singh Kunjwal claims 6 BJP MLA will soon join Congress)

उत्तराखंड भाजपमध्ये भूकंप, सहा आमदारांचा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश; काँग्रेस नेत्याचा दावा
Govind Singh Kunjwal

डेहराडून: उत्तराखंड भाजपमध्ये लवकरच भूकंप होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष गोविंद सिंह कुंजवाल यांनी येत्या पंधरा दिवसात भाजपचे सहा आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. राज्यात काँग्रेसची लाट असून काँग्रेसचचं सरकार स्थापन होणार असल्याचा दावाही कुंजवाल यांनी केला आहे. मात्र, कुंजवाल यांच्या या दाव्याने भाजपच्या तंबूत एकच खळबळ उडाली आहे.

उत्तराखंडच्या निवडणुका जवळ येताच राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अनेक आमदार पक्षांतर करण्याच्या तयारी आहेत. अशावेळी काँग्रेस नेते गोविंद सिंह कुंजवाल यांनी हे विधान केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र हे आमदार कोण आहेत हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. तीन आमदार गढवाल मंडल येथील असून तीन कुमाऊ येथील असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

भाजप सरकार निष्क्रिय

यावेळी कुंजवाल यांनी सरकारच्या धोरणांवर टीकाही केली आहे. राज्यातील भाजप सरकार हे निष्क्रिय सरकार आहे. डबल इंजिनचं सरकार असूनही विकास होत नाहीये. आज राज्यातील जनतेच्या मूलभूत गरजाही पूर्ण होत नाहीये. काँग्रेसकडे राज्यातील जनता मोठ्या अपेक्षने पाहत आहे. भाजपला धडा शिकवण्याच्या तयारीत राज्यातील जनता आहे, असं त्यांनी सांगितलं.

आमदार घाबरले

बेरोजगारी, महागाईमुळे राज्यातील जनता परेशान आहे. त्यामुळेच राज्यातील जनता भाजपला धडा शिकवणार आहे. कोरोना काळात गरीबांना रोजी रोटीसाठी त्रस्त व्हावं लागलं होतं. त्यामुळे जनतेत आक्रोश आहे. म्हणून भाजपचे आमदार घाबरले आहेत. लोकांच्या नाराजीचा फटका बसण्याची भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळेच ते काँग्रेसमध्ये येण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील सहा आमदार तर येत्या 15 दिवसात काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असं त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

ईडी, सीबीआय, एनसीबीसह किरीट सोमय्यांना जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा, फार पॉवरफुल्ल आहेत ते; संजय राऊतांचा हल्ला

VIDEO | दहशतवादी लपलेले घरच भारतीय लष्कराने उडवले, इमारत झाली बेचिराख

VIDEO: सुरतच्या फॅक्ट्रीला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी मजुरांच्या पाचव्या मजल्यावरून उड्या; दोघांचा मृत्यू

(MLA Govind Singh Kunjwal claims 6 BJP MLA will soon join Congress)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI