VIDEO | दहशतवादी लपलेले घरच भारतीय लष्कराने उडवले, इमारत झाली बेचिराख

21 सेकंदाच्या व्हिडिओच्या सुरुवातीला एक घर दिसते. यामध्ये दहशतवादी लपून सुरक्षा दलांवर हल्ला करत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सैनिकांनी इमारतीलाच लक्ष्य केले.

VIDEO | दहशतवादी लपलेले घरच भारतीय लष्कराने उडवले, इमारत झाली बेचिराख
दहशतवादी लपलेले घरच भारतीय लष्कराने उडवले, इमारत झाली बेचिराख
Follow us
| Updated on: Oct 17, 2021 | 8:42 PM

जम्मू : काही दिवसांपूर्वी गैर काश्मिरींना लक्ष्य केल्यानंतर भारतीय सेनेने दहशतवाद्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. एका मागोमाग एक अनेक चकमकी होत आहेत, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात येत आहे. अशाप्रकारे काल पुलवामा जिल्ह्यातील पंपोरमध्ये सुरक्षाबलांनी एनकाऊंटर केला. या एनकाऊंटरमध्ये लष्कराच्या टॉप कमांडरसह दोन दहशतवाद्यांना लष्कराने कंठस्नान घातले. आता या चकमकीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर स्पष्ट कळते की, लष्कराने आता खोऱ्यातून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. सुरक्षा दलांना कोणत्याही किंमतीत कोणतीही चूक करायची नाही. (The terrorist hideout was targeted by the Indian Army, see in the viral video)

दहशतवादी लपलेली इमारतच लष्कराने केली लक्ष्य

पंपोर चकमकीतून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये लष्कराच्या जवानांनी ज्या घरात दहशतवादी लपले होते ते घरच उडवले आहे. जेव्हा सुरक्षा दलांना दहशतवाद्यांच्या लपल्याची माहिती मिळाली, तेव्हा चकमक सुरू झाली. दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला, तर दुसरा इमारतीत लपला होता. यानंतर, स्थानिक लोकांना या भागातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, जेणेकरून त्यांना यात इजा होणार नाही. नंतर लष्कराच्या जवानांनी स्फोटाद्वारे संपूर्ण घर पाडले. यामध्ये दुसरा दहशतवाद्याचाही खात्मा झाला. 21 सेकंदाच्या व्हिडिओच्या सुरुवातीला एक घर दिसते. यामध्ये दहशतवादी लपून सुरक्षा दलांवर हल्ला करत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सैनिकांनी इमारतीलाच लक्ष्य केले.

स्फोट होताच इमारत काही सेकंदात कोसळली. संपूर्ण परिसरात मलब्याचे ढीग पसरले. धुळीने घराच्या सभोवतालचा परिसर भरून गेला. त्याचवेळी जवळच उभ्या असलेल्या वाहनांचे आवाजही ऐकू आले. व्हिडिओ पाहताना स्पष्टपणे दिसून येते की यावेळी लष्कर नागरिकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सज्ज आहे. या संदर्भात, गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरपासून नवी दिल्लीपर्यंत बैठका घेण्यात आल्या आहेत, ज्यात एनएसए अजित डोभाल देखील सहभागी झाले आहेत. अलीकडेच, पीएम मोदींनी अजित डोवाल यांच्याशी काश्मीर आणि सीमेवरील परिस्थितीबद्दल संभाषण केले. तेव्हापासून असा अंदाज लावला जात होता की, सरकारने दहशतवाद्यांविरोधात महत्त्वाची रणनीती आखली आहे.

चकमकीत लष्करचा टॉप कमांडरही ठार

शनिवारी पंपोर चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केले, त्यापैकी एकाची ओळख टॉप 10 दहशतवादी आणि लष्कर कमांडर उमर मुश्ताक खांडे म्हणून झाली. दुसऱ्याचे नाव खुर्शीद दार असल्याचे सांगण्यात आले. संरक्षण पीआरओने दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा दलांना पंपोर, पुलवामा येथे दहशतवाद्यी लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर चकमक सुरू झाली. लष्कराने दहशतवाद्यांकडून एके-47 देखील जप्त केले आहे. मुश्ताक काश्मीरमधील दोन पोलिसांच्या मृत्यूसह इतर दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता. त्याने इतर दहशतवाद्यांसोबत बाराझुल्ला परिसरात पोलीस पार्टीवर हल्ला केला, ज्यात दोन पोलीस शहीद झाले. तेव्हापासून लष्कर त्याचा युद्धपातळीवर शोध घेत होते.

लष्कराने रणनीतीमध्ये केला बदल

या महिन्याच्या सुरुवातीपासून जम्मू-काश्मीरमध्ये अनेक गैर-काश्मिरींना लक्ष्य करण्यात आले आहे. दहशतवादी नवीन रणनीतीचा अवलंब करून टार्गेट किलिंग करत आहेत. यामध्ये बिहार, यूपीच्या सामान्य लोकांना लक्ष्य करण्यात आले आहे, तर काश्मिरी पंडितांचीही हत्या करण्यात आली आहे. लष्करानेही आपली रणनीती बदलून दहशतवादविरोधी कारवायांना गती दिली आहे. आता सुरक्षा दल दहशतवाद्यांना कोणतेही समर्थन देण्यास तयार नाहीत. दहशतवादी लपले होते त्या घराला उडवून देणे लष्कराच्या रणनीतीचाही हा एक भाग आहे. गेल्या दहा दिवसांत नऊ चकमकींमध्ये 13 दहशतवादी ठार झाले आहेत. (The terrorist hideout was targeted by the Indian Army, see in the viral video)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.