AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जम्मू काश्मीरच्या पुंछ राजौरीत सातव्या दिवशी दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन सुरु, आतापर्यंत सैन्यदलाचे 9 जवान शहीद

जम्मू -काश्मीरमध्ये लष्कराच्या सात जवानांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी पुंछ आणि राजौरी जिल्ह्यातील जंगलात सैन्य दलाकडून शोध मोहीम रविवारी सातव्या दिवशीही सुरू आहे.

जम्मू काश्मीरच्या पुंछ राजौरीत सातव्या दिवशी दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन सुरु, आतापर्यंत सैन्यदलाचे 9 जवान शहीद
पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा पोस्ट ऑफीसवर हल्ला
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Oct 17, 2021 | 1:47 PM
Share

नवी दिल्ली: जम्मू -काश्मीरमध्ये लष्कराच्या सात जवानांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी पुंछ आणि राजौरी जिल्ह्यातील जंगलात सैन्य दलाकडून शोध मोहीम रविवारी सातव्या दिवशीही सुरू आहे. या दरम्यान, कनिष्ठ कमिशन्ड ऑफिसरसह (जेसीओ) दोन सैनिक शहीद झाले. दोन जवानांच्या मृत्यूमुळं आतापर्यंत शहीद झालेल्या जवानांची संख्या 9 वर पोहोचली आहे. पुंछच्या सुरणकोटे जंगलात सोमवारी सुरू झालेल्या कारवाईत आतापर्यंत नऊ सैनिक शहीद झाले आहेत. पुढे ही शोधमोहीम पुंछमधील मेंढर आणि राजौरीतील थानामंडीपर्यंत सुरु आहे.

उत्तराखंडमधील 2 जवान शहीद

गुरुवारी दहशतवाद्यांशी चकमक झाली होती त्या ठिकाणाजवळ मेंढरच्या नार खास जंगल परिसरात एक जेसीओ आणि जवानाचे मृतदेह सापडले. या दरम्यान, जीव गमावलेल्या सैनिकांची संख्या आता चार झाली आहे. याआधी, नार खास जंगलात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत रायफलमन विक्रम सिंह नेगी आणि योगम्बर सिंह शहीद झाल्याच्या वृत्ताची खातरजमा करण्यात आली आहे. नेगी आणि सिंह दोघेही उत्तराखंडचे होते.

सैन्य दलाचे पीआरओ लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी ‘दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी कार्यरत आहोत. सुभेदार अजय सिंह आणि नाईक हरेंद्र सिंह या दरम्यान शहीद झाले आणि त्यांचे पार्थिव सापडले आहेत. द इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्रानुसार, शहीद झालेले जवान जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांनी सुरू केलेल्या शोध मोहिमेचा भाग होते.

शहीद झालेल्या जवानांची संख्या 9 वर

11 ऑक्टोबर रोजी पाच जवानांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी एका कनिष्ठ कमिशन्ड अधिकारी शहीद झाला होता. दहशतवादी पुंछच्या सुरणकोटे जंगलात सैन्य गस्त घालत होते. दहशतवादी अधिकारी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणांकडे स्थलांतरित होत आहेत. राजौरीच्या थानामंडी जंगलात दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक झाली. मेंढर ते थानामंडीपर्यंतचा संपूर्ण जंगल परिसर सैन्य दलानं सर्च ऑपरेशन सुरु केलंय. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दहशतवादी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आहे.

राजौरी-पुंछ रेंजचे पोलीस उपमहानिरीक्षक विवेक गुप्ता यांनी मंगळवारी पूंछमधील सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून या परिसरात लपून बसल्याची माहिती दिली. जम्मू प्रदेशातील राजौरी आणि पुंछ भागात यावर्षी जूनपासून घुसखोरीचे प्रयत्न वाढले आहेत. वेगवेगळ्या चकमकींमध्ये आतापर्यंत नऊ दहशतवादी मारले गेले आहेत.

इतर बातम्या:

पुंछ सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी सामना, कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यासह 4 जवान शहीद

दादरा नगर हवेलीत शिवसेनेचा आवाज घुमणार? डेलकरांच्या प्रचारासाठी ठाकरे भाजपच्या गडात शड्डू ठोकण्याच्या तयारीत

Indian Army conduct search operation at Jammu and Kashmir continue in poonch rajouri on seventh day

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ