बाईकची कारला धडक झाल्याने, एडमिट झाला तर पॅण्टच्या खिशातच मोबाईलचा ब्लास्ट झाला
मोबाईलच्या बॅटरीचे स्फोट झाल्याचे फोटो आणि बातमी अधूनमधून येत असते.त्यामुळे लोकांनी मोबाईल वापरताना काळजी पूर्वक तो वापरला पाहीजे, अशीच एक धक्कादायक घटना एका रुग्णालयात घडली आहे.

उत्तर प्रदेशचा बाराबंकी जिल्हा रुग्णालयात एक विचित्र घटना घडलेली आहे. येथे एका रुग्णालयात एका रुग्णाच्या पॅण्टीतला मोबाईल अचानक धुर येऊ लागला अन् कळायच्या या मोबाईलचा ब्लास्ट झाला. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात एकच खळबळ उडाली. या घटनेने रुग्णालयातील रुग्ण आणि स्टाफ प्रचंड घाबरले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.
उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्हा रुग्णालयात शनिवार सकाळी सकाळी हडकंप झाला.एका रुग्णाला भरती केले असताना त्याच्या पॅण्टीतील मोबाईलचा स्फोट झाला. या घटनेने अफरातफरी माजली. रुग्णालयाचा स्टाफही सैरावैरा धावू लागला. त्यानंतर अग्निशामक उपकरणांनी ही आग कशीबशी विझवण्यात आली. बाराबकीच्या उज्ज्वल नगरात राहणाऱ्या अवनीश पाल यांच्या बाईकची टक्कर एका कारशी झाली. या अपघातात जखमी झालेल्या तरुणाना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याच्या मोबाईलचा ब्लास्ट झाला.या घटनेनंतर अखेर इमर्जन्सी वॉर्डात हाहाकार माजला. अखेर या तरुणाला वाचविण्यात कसे बसे यश आले.
शॉर्ट सर्किटमुळे मोबाईलला आग लागली
घटना घडली तेव्हा वॉर्डमधील बहुतेक रुग्ण झोपेत होते. स्फोटाचा आवाज ऐकून सर्वजण घाबरुन जागे झाले आणि सैरावैरा पळू लागल्याने आणि चेंगराचेंगरी झाली. रुग्णालयातील कर्मचारीही घाबरून बाहेर पळू लागले. मात्र, मोबाईलचा ब्लास्ट असल्याचे निष्पन्न होताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अग्निशामक सिलिंडरच्या मदतीने आग आटोक्यात आणली. या घटनेत अवनीशचा मोबाईल संपूर्णपणे जळाला, परंतु सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
रुग्णांत पसरली घबराट
रात्रीची वेळ असल्याने शांततेत अचानक स्फोटाच्या मोठा आवाज झाल्याने रुग्णालयातील सर्व रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक घाबरले. बराच वेळ रुग्णालयात घबराटीचे वातावरण होते. अखेर मोबाईलचा स्फोट असल्याची माहिती समोर आल्यानंतर परिस्थिती हळूहळू सामान्य झाली. कदाचित शॉर्ट सर्किटमुळे या मोबाईलचा स्फोट झाला असावा, हा तो मोबाईल फोन मोटोरोला कंपनीचा होता अशी माहीती पोलीस सूत्रांनी दिली.
