AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील मॉक ड्रिल होणारे जिल्हे कोणते, 54 वर्षांनंतर होणारी मॉक ड्रिल नेमकी कशी असणार?

आप्तकालीन परिस्थितीत सायरन वाजवले जातात. या सायरनचा आवाज खूप मोठा असतो. दोन ते पाच किलोमीटरपर्यंत त्याच्या आवाजाची रेंज असते. 120-140 डेसिबलपर्यंत त्याचा आवाज असतो. त्या आवाजात एक सायक्लिक पॅटर्न असतो. आवाज हळूहळू वाढते त्यानंतर कमी होत असते.

देशातील मॉक ड्रिल होणारे जिल्हे कोणते, 54 वर्षांनंतर होणारी मॉक ड्रिल नेमकी कशी असणार?
mock drillImage Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
| Updated on: May 06, 2025 | 12:34 PM
Share

भारत-पाकिस्तान दरम्यान वाढत असणाऱ्या तणावामुळे केंद्र सरकारने 7 मे रोजी मॉक ड्रिल करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात आदेश काढले आहे. या दरम्यान हल्ल्यापासून वाचण्यासाठी नागरिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी देशभरातील 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल होणार आहे. देशात यापूर्वी 1971 मध्ये मॉक ड्रिल करण्यात आले होते.

कोणत्या जिल्ह्यात होणार मॉक ड्रिल

मॉक ड्रिल देशातील 244 सिव्हिल डिफेन्स डिस्ट्रिक्ट (नागरिक सुरक्षा जिल्हे) मध्ये होणार आहे. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील नागरिकांना सुरक्षा नीती आणि नागरिक सुरक्षा उपयासंदर्भात जागरुक करण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. यासंदर्भात नागरिक सुरक्षा अधिनियम कायदा 1968 मध्ये संसदेत संमत करण्यात आला होता. हा कायदा संपूर्ण देशात लागू आहे. त्यानंतरही शत्रू राष्ट्राचे लक्ष असणारा भाग, संवेदनशील ठिकाणांचा समावेश त्यात करण्यात आला. त्यात 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल करण्याची योजना आहे. हे जिल्हे भारत आणि पाकिस्तान सीमारेषेच्या जवळपास आहे. त्यात जम्मू काश्मीर, राजस्थान, गुजरात, पंजाब सारख्या राज्यातील जिल्हे येतात.

नागरी संरक्षणाची उद्दिष्टे म्हणजे लोकांचे जीव वाचवणे, मालमत्तेचे नुकसान कमीत कमी करणे हे आहे. तसेच लोकांचे मनोबल उंचावणे आहे. युद्ध आणि आणीबाणीच्या काळात नागरी संरक्षण संघटना महत्त्वाची भूमिका बजावतात. ज्यामध्ये ते अंतर्गत भागांचे संरक्षण करतात. सशस्त्रदलांना मदत करतात.

महाराष्ट्रातील या ठिकाणी होणार मॉक ड्रिल

कसे वाजतात युद्धाचे सायरन?

आप्तकालीन परिस्थितीत सायरन वाजवले जातात. या सायरनचा आवाज खूप मोठा असतो. दोन ते पाच किलोमीटरपर्यंत त्याच्या आवाजाची रेंज असते. 120-140 डेसिबलपर्यंत त्याचा आवाज असतो. त्या आवाजात एक सायक्लिक पॅटर्न असतो. आवाज हळूहळू वाढते त्यानंतर कमी होत असते.

सायरन वाजल्यावर काय करावे?

  • सुरक्षित स्थळी जाऊन थांबावे
  • 5 ते 10 मिनिटांत सुरक्षित स्थळी पोहचा.
  • सायरन वाजल्यावर घाबरुन जाऊ नका.
  • सायरन वाजल्यावर उघड्या जागेपासून दूर व्हा.
  • घर आणि सुरक्षित इमारतींमध्ये जाऊन थांबा.
  • टीव्ही, रेडिओ, सरकारी अलर्ट्सवर लक्ष द्या.
  • अफवांवर विश्वास ठेऊ नका. सरकारच्या निर्देशावर लक्ष द्या.

सायरन कुठे-कुठे वाजणार

  • सरकारी भवन
  • प्रशासनिक भवन
  • पोलीस मुख्यालय
  • फायर स्टेशन
  • सैन्य ठिकाणे
  • शहरातील मोठे बाजार
  • गर्दी असणारी ठिकाणे

सिव्हिल मॉक ड्रिल कोण-कोण?

  • जिल्हाधिकारी
  • स्थानिक प्रशासन
  • सिव्हील डिफेन्स वार्डन
  • पोलीस
  • होम गार्ड्स
  • कॉलेज-शाळेतील विद्यार्थी
  • राष्ट्रीय कॅडेट कोर (NCC)
  • राष्ट्रीय सेवा योजना (NSS)
  • नेहरू युवा केंद्र संघटन (NYKS)
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.