AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंकीपॉक्सचा धोका पुन्हा वाढला; पुण्यातील प्रयोगशाळेत 100 नमुन्यांची चाचणी

रुग्णांच्या तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांमधून मंकीपॉक्स विषाणू (Monkeypox Virus) वेगळे करण्यात संशोधकांना यश आले आहे. हा विषाणू वेगळा काढण्यासाठी वैज्ञानिकांची एक टीम तयार करण्यात आली होती. या टीमला रुग्णाच्या नमुन्यातून मंकीपॉक्स विषाणू वेगळे करण्यात यश आले आहे.

मंकीपॉक्सचा धोका पुन्हा वाढला; पुण्यातील प्रयोगशाळेत 100 नमुन्यांची चाचणी
| Updated on: Aug 03, 2022 | 4:39 PM
Share

 दिल्ली :  मंकीपॉक्सचा(Monkeypox) धोका पुन्हा एकदा वाढला आहे. 75 देशांमध्ये या विषाणूचा फैलाव झाला आहे. दिल्लीत मंकीपॉक्सचा आणखी एक रुग्ण सापडला आहे. दिल्लीत आफ्रिकन वंशाच्या 35 वर्षीय पुरुषाची मंकीपॉक्सची चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे. या व्यक्तीचा परदेश प्रवासाचा कोणताही इतिहास नसल्याची माहिती समोर आली आहे. देशातील मंकीपॉक्सच्या एकूण रुग्णांची संख्या 8 वर पोहचलीली आहे. आयसीएमआर (ICMR) म्हणजेच इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्चच्या (Indian Council for Medical Research) पुणे (Pune) येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेच्या (NIV-National Institute of Virology Lab) प्रयोग शाळेने बुधवारी सकाळपर्यंत सुमारे 100 नमुन्यांची चाचणी केली आहे. ICMR ने चाचण्यांवर भर वाढवला आहे. मंकीपॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी आणि यावर प्रभावी लस विकसीत करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. एका रुग्णाच्या नमुन्यांमधून मंकीपॉक्स विषाणूला (Monkeypox Virus) वेगळं केलं आहे. यामुळे मंकीपॉक्स विषाणूविरोधी लस बनवण्यात मदत होणार आहे.

आयसीएमआरने भारतीय लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना विषाणूचा नमुन्यांवर अभ्यास करत मंकीपॉक्स विषाणूवरील लस विकसित करण्यासाठी आवाहन केलं आहे. सरकारने लस निर्मिती कंपन्यांना विषाणूवरील लस आणि टेस्टिंग किट तयार करण्याचं आवाहन देखील केले आहे. देशात मंकीपॉक्सचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दिल्लीमध्ये मंगळवारी 35 वर्षीय व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाल्याचं रिपोर्ट नुसार स्पष्ट झालं आहे.

2 ऑगस्टच्या सकाळपर्यंत, ICMR-NIV पुणे आणि VRDL येथे अंदाजे 100 नमुन्यांची चाचणी केली असल्याची माहिती ICMR-NIV, पुणे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रज्ञा यादव यांनी दिली. दिल्लीतील नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने देखील मंकीपॉक्सचा विषाणू शोधण्यासाठी नमुन्यांची चाचणी सुरू केली आहे. ICMR-NIV NCDC देशभरील 15 प्रयोगशाळांच्या माध्यमातून नमुने गोळा केले जात आहेत.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे नमुने गोळा केले जात आहेत.

मंकीपॉक्स विषाणू वेगळं करण्यात यश

रुग्णांच्या तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांमधून मंकीपॉक्स विषाणू (Monkeypox Virus) वेगळे करण्यात संशोधकांना यश आले आहे. हा विषाणू वेगळा काढण्यासाठी वैज्ञानिकांची एक टीम तयार करण्यात आली होती. या टीमला रुग्णाच्या नमुन्यातून मंकीपॉक्स विषाणू वेगळे करण्यात यश आले आहे.

टेस्टिंग किट, उपचार आणि लस यावर लवकरच संशोधन होईल

2020 मध्ये जेव्हा कोरोना महामारी सुरू झाली, त्या काळात प्रथम कोरोना विषाणूला वेगळे करण्यात आम्हाला यश आले होते. त्यानंतर चाचणी किट तयार करण्यात आली आणि कोवॅक्सिन लस देखील शोधण्यात आली. यावेळी मंकीपॉक्सचा विषाणू वेगळा करण्यात देखील यश आले आहे. लवकरच टेस्टींग किट, उपचार आणि लस इत्यादींबाबत पुढील अभ्यास लवकरच सुरू होईल एनआयव्हीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.प्रज्ञा यादव यांनी सांगितले.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.