Monsoon : मान्सूनचा जोर कोकणावर, दोन दिवसांनी बदलणार मराठवाडा अन् विदर्भातले चित्र

राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यापासून कोकणावर कृपादृष्टीच राहिलेले आहे. गेल्या महिन्याभरात याच विभागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे शिवाय सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस केवळ याच विभागात झाला असून आणखी 48 तास पावसामध्ये सातत्य राहणार असल्याचा अंदाज आहे. याशिवाय राज्यातील इतरत्र भागातही पाऊस सक्रीय होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Monsoon : मान्सूनचा जोर कोकणावर, दोन दिवसांनी बदलणार मराठवाडा अन् विदर्भातले चित्र
मान्सून राज्यात सक्रीय होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
राजेंद्र खराडे

|

Jul 02, 2022 | 5:19 PM

मुंबई : महिनाभरापूर्वी (Kokan) कोकणात दाखल झालेला पाऊस अद्यापही संपूर्ण राज्यात सक्रीय झालेला नाही. (Monsoon) पावसाचा लहरीपणा कायम असून विदर्भ, मराठवाड्यात कही खुशी, कही गम अशीच स्थिती आहे. या दोन्ही विभागात केवळ ढग दाटून येत असून उर्वरित राज्यात ऊन-सावलीचा खेळ सुरु आहे. त्यामुळे जुलै महिना उजाडला तरी (Kharif Crop) खरिपाच्या पेरण्यांना सुरवात झालेली नाही. मान्सूनच्या लहरीपणाचा प्रत्यय राज्यात नव्हे तर देशभरात येत आहे. असे असले तरी सोमवारपासून चित्र बदलेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून सोमवारपासून राज्यात पाऊस सक्रीय होईल असा अंदाज आहे. आता पावसाने हजेरी लावली तरच पेरणी झालेल्या क्षेत्रावरील पिकांना जीवदान मिळणार आहे.

काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यापासून कोकणावर कृपादृष्टीच राहिलेले आहे. गेल्या महिन्याभरात याच विभागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे शिवाय सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस केवळ याच विभागात झाला असून आणखी 48 तास पावसामध्ये सातत्य राहणार असल्याचा अंदाज आहे. याशिवाय राज्यातील इतरत्र भागातही पाऊस सक्रीय होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर सोमवारपासून विदर्भातील काही भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे आतापर्यंत पावसाने लहरीपणा दाखविला आहे. आगामी काळात अंदाजानुसार सर्वदूर पाऊस झाला तर खरिपाला पोषक वातावरण राहणार आहे.

कोकणात ऑरेंज अलर्ट, मुंबई उपनगरातही पाऊस

कोकणात पावसामध्ये सातत्य तर राहणार आहेच पण जोरही वाढणार आहे. त्यामुळे खरीप हंगामाला पोषक वातावरण झाले आहे. शिवाय गेल्या 4 दिवसांपासून मुंबईसह उपनगरात पावसाने हजेरी लावली आहे. यामध्येही सातत्य राहणार असल्याचा अंदाज आहे. यंदा सुरवातीपासूनच सर्वदूर असा पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप पिकांबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. कोकण वगळता राज्यातील सर्व विभागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे.

तरच खरीप हंगाम बहरणार

खरीप हंगाम उत्पादनाच्यादृष्टीने महत्वाचा आहे. असे असले तरी जुलै महिना उजाडला असताना राज्यात केवळ 30 लाख हेक्टरावर पेरा झाला आहे. शिवाय पेरणी झालेल्या क्षेत्रातही पावसाने ओढ दिल्याने चिंता व्यक्त होत आहे तर आता पाऊस झाला तरच पेरणीही करता येणार आहे. खरिपाची पेरणी ही 15 जुलैपर्यंत केली जाते. त्यामुळे आता पाऊस झाला तरच खरीप पदरात अन्यथा नुकसान अशीच स्थिती आहे.

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें