
राजस्थानच्या रखरखीत वाळवंटातील जैसलमेर जवळील पोखरण फिल्ड फायरिंग रेंजमध्ये डीआरडीओने स्वदेशी एंटी- टॅंक गायडेड मिसाईल MP-ATGM यशस्वी चाचणी घेतली आहे. हे एक अत्यंत घातक क्षेपणास्र असून त्याने शत्रूचे रणगाडे आणि चिलखती वाहनांचा चक्काचूर करता येणार आहे. या क्षेपणास्राला भारतीय रणगाड्यांमध्ये बसविले जाण्याची शक्यता आहे.
डिफेन्स रिसर्च एण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थात DRDO या संस्थेने नवीन शस्राची चाचणी केली आहे. मॅन -पोर्टेबल एंटी-टॅंक गायडेड मिसाइल (MPATGM) नावाचे हे अस्र भयानक विनाशक आहे. याचा व्हिडीओ देखील जारी करण्यात आला आहे.
येथे पहा व्हिडीओ –
MPATGM trials, probably the only video where you can feel the warhead. pic.twitter.com/vu570TApwQ
— Dany (@wartrophy_414) August 13, 2024
भविष्यात आपला प्रमुख रणगाडा अर्जुन याच्यात या मिसाईलची तैनाती होणार आहे.पोखरणच्या रणात या मिसाईल आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला आहे.या स्वदेशी निर्मित रणगाडा विरोधी मिसाईलमध्ये टॅंडम हाय एक्सप्लोसिव्ह एंटी-टॅंक (HEAT) हत्यार लावण्यात आले आहे. हा अत्याधुनिक एक्सप्लोसिव्ह रिएक्टिव आर्मर (ERA) चे कवच असणार्या चिलखती गाड्यांना भेदू शकते. यामुळे आजच्या काळातील कोणताही रणगाडा आणि किंवा चिलखती वाहन याच्या हल्ल्यापुढे निभाव धरू शकणार नाही. जागच्याजागी त्याचा संपूर्ण नायनाट होणार आहे.
या रणगाडा विरोधी मिसाईलच्या अनेक चाचण्या झालेल्या आहेत. याचे वजन 14.50 किलो आहे. तर लांबी 4.3 फूट आहे. याला डागण्यासाठी दोन लोकांची आवश्यकता असते. याची रेंज 200 मीटरपासून ते 2.50 किलोमीटर आहे. यात टॅंडम चार्ज हिट आणि पेनेटेशन वॉरहेड देखील लावण्याची सोय आहे. भारतीय लष्करात हे रणगाडा विरोधी क्षेपणास्र दाखल झाल्यानंतर फ्रान्समधून आणलेल्या मिलन – 2 टी आणि रशियातून आणलेल्या कॉन्कर्स एंटी-टॅंक गायडेड मिसाईलची जुन्या आवृत्या हटविण्यात येणार आहेत.