AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लव्ह जिहाद’ नामंजूर,… तर 10 वर्षांची शिक्षा; मध्य प्रदेशात ‘धार्मिक स्वातंत्र्य विधेयक’ मंजूर

राज्यातील लव्ह जिदाची प्रकरणं रोखण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने 'धार्मिक स्वातंत्र्य विधेयक 2020'ला मंजुरी दिली आहे. (MP cabinet approves 'love jihad law', forced conversion will invite 10-year-jail term)

'लव्ह जिहाद' नामंजूर,... तर 10 वर्षांची शिक्षा; मध्य प्रदेशात 'धार्मिक स्वातंत्र्य विधेयक' मंजूर
| Updated on: Dec 26, 2020 | 12:30 PM
Share

भोपाळ: राज्यातील लव्ह जिदाची प्रकरणं रोखण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने ‘धार्मिक स्वातंत्र्य विधेयक 2020’ला मंजुरी दिली आहे. या कायद्यात अल्पवयीन मुलगी, अनुसूचित जाती, जमातीतील मुलींना फूस लावून लग्न केल्यास आणि हा आरोप सिद्ध झाल्यास आरोपीला 2 ते 10 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि एक लाख रुपयांच्या आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच धन-संपत्तीच्या लालसेपोटी धर्म लपवून लग्न केलं तर हा विवाह ‘शून्य विवाह’ समजला जाण्याची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशापाठोपाठ लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा करणारं मध्य प्रदेश हे देशातील दुसरं राज्य ठरलं आहे. (MP cabinet approves ‘love jihad law’, forced conversion will invite 10-year-jail term)

शिवराज सिंह चौहान सरकारची आज कॅबिनेटची बैठक झाली. त्यात या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. या विधेयकात एकूण 19 कलम आहेत. धर्मांतराच्या प्रकरणात पीडित कुटुंबाने तक्रार केल्यास पोलीस कारवाई करणार असल्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. आम्ही मध्य प्रदेशात सर्वाधिक कडक कायदा केला आहे. हे विधेयक विधानसभेत मांडलं जाईल. 28 डिसेंबर रोजी विधानसभेचं हिवाळी अधिवेशन होणार आहे, असं राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितलं.

या कायद्याची उत्तर प्रदेशच्या कायद्याशी तुलना करताना मिश्रा म्हणाले की, आम्ही कोणाशीही तुलना करत नाही. परंतु हा देशातील सर्वात कडक कायदा आहे एवढं निश्चित. धर्म परिवर्तन करून लग्न केल्यानंतर घटस्फोट झाल्यास या दाम्पत्याच्या मुलांनाही संपत्तीत हक्क देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पीडित तरुणीला पोटगी देण्याचीही त्यात तरतूद आहे, असं मिश्रा यांनी स्पष्ट केलं.

काय आहे हा कायदा

>> अल्पवयीन मुलगी, अनुसूचित जाती, जमातीतील मुलींना फूस लावून लग्न केल्यास आणि हा आरोप सिद्ध झाल्यास शिक्षेची तरतूद

>> नव्या कायद्यानुसार लग्न करण्यापूर्वी दोन महिने आधी पूर्व सूचना द्यावी लागणार आहे. पूर्व सूचनेशिवाय केलेला विवाह शून्य विवाह मानला जाणार आहे.

>> फूस लावून धर्मांतर करून विवाह करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण व्हावी म्हणून एक लाखाच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

>> जबरदस्ती लग्न लावून देण्याच्या प्रकरणात पंडित किंवा मौलवी दोषी आढळून आले तर त्यांच्याविरोधातही कठोर कारवाई करण्यात येईल. लव्ह जिहाद रोखण्यासाठी हा सर्वात कडक कायदा असल्याचं मध्य प्रदेश सरकारचं म्हणणं आहे. (MP cabinet approves ‘love jihad law’, forced conversion will invite 10-year-jail term)

संबंधित बातम्या:

‘शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी पंतप्रधान टीव्हीवर भाषणबाजी करताहेत’, ममता बॅनर्जींचा घणाघात

जम्मू-काश्मीर : लष्कराच्या तळाची बॅरेक कोसळली; दोन जवान शहीद

उद्या मोहन भागवत मोदींविरोधात बोलले तर त्यांनाही अतिरेकी ठरवलं जाईल; राहुल गांधींचा हल्लाबोल

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.