AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी पंतप्रधान टीव्हीवर भाषणबाजी करताहेत’, ममता बॅनर्जींचा घणाघात

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे (Mamta Banerjee slams PM Narendra Modi).

'शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी पंतप्रधान टीव्हीवर भाषणबाजी करताहेत', ममता बॅनर्जींचा घणाघात
| Updated on: Dec 25, 2020 | 10:14 PM
Share

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांना पीएम किसान सम्मान निधी योजनेचे पैसे दिले जात नसल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता. या आरोपांना मतात बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मिटवण्याऐवजी मोदी लोकांची दिशाभूल करत आहेत. ते बंगालची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत”, अशा शब्दात ममता बॅनर्जींनी पलटवार केला (Mamta Banerjee slams PM Narendra Modi).

“नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी देशभरातील लाखो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. हे कायदे शेतकरी विरोधी आहेत. कारण ते एमएसपी, राज्य खरेदी प्रणाली आणि संरक्षक यंत्रणा काढून टाकण्याची मागणी करतात. पंतप्रधान शेतकऱ्यांचे विषय सोडवण्याऐवजी टीव्हीवर चिंता व्यक्त करत आहेत”, असा टोला त्यांनी लगावला.

“त्यांनी पंतप्रधान किसान योजनेच्या माध्यमातून पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांना मदत करण्याचा इरादा जाहीरपणे व्यक्त केला आहे. दुसरीकडे त्यांनी राज्य सरकार सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे. ते अर्धवट माहिती आणि विकृत तथ्य सांगून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे”, असं मत ममता यांनी मांडली.

“मी शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार्य करण्यास तयार आहे. मी स्वतः त्यांना दोनवेळा पत्र लिहिलं आहे. दोन दिवसांपूर्वी संबंधित मंत्र्यांशी बोलले आहे, पण राजकीय फायद्यासाठी ते सहकार्य करण्यास नकार देत आहेत. दुसरीकडे चुकीचा प्रसार करत आहेत”, असं ममता म्हणाल्या (Mamta Banerjee slams PM Narendra Modi).

“भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकार नियमांचं उल्लंघन करुन राजकारण करत आहे. केंद्र सरकारने बंगालच्या मदतीसाठी काहीच केलं नाही. जीएसटीचे आतापर्यंतची साडेआठ हजार कोटी रुपयांचे पैसे दिलेले नाहीत. केंद्र सरकारने राज्यांना निदान त्यांच्या हक्काचा निधी द्यायला हवा जेणेकरुन राज्यांमधील सुविधांसाठी तो पैसा वापरता येईल. त्यांनी पैसे दिले तर बंगालच्या लोकांसाठी सगळं करु जे केंद्र सरकार “, अशी भूमिका ममता बॅनर्जी यांनी मांडली.

हेही वाचा : भाजपची हुकूमशाही, ईडी दाखवली तर आता सीडीही निघणार, अमोल मिटकरींचा इशारा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.