अखेर मध्य प्रदेशातील अंतिम निकाल जाहीर!

मुंबई : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. ईशान्य भारतात हातात असलेलं एकमेव राज्य गमावलं असलं तरी हिंदी भाषिक तीन राज्यांमध्ये काँग्रेसने भाजपला चितपट केलंय. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान ही तीन राज्य काँग्रेसने भाजपच्या ताब्यातून हिसकावून घेतली आहेत. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने बहुमत मिळवलंय, …

, अखेर मध्य प्रदेशातील अंतिम निकाल जाहीर!

मुंबई : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. ईशान्य भारतात हातात असलेलं एकमेव राज्य गमावलं असलं तरी हिंदी भाषिक तीन राज्यांमध्ये काँग्रेसने भाजपला चितपट केलंय. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान ही तीन राज्य काँग्रेसने भाजपच्या ताब्यातून हिसकावून घेतली आहेत. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने बहुमत मिळवलंय, तर मध्य प्रदेशात इतर पक्षांची मदत काँग्रेसला घ्यावी लागणार आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर मध्य प्रदेशातील चित्रही स्पष्ट झालंय.

सर्व राज्यांचा निकाल जाहीर झाला तरीही मध्य प्रदेशातील निकाल मात्र लांबला होता. अखेर मध्य प्रदेशातील सर्व जागांचा निकाल जाहीर झाला आहे. काँग्रेसला बहुमतासाठी इथे दोन जागांची गरज आहे. पण काँग्रेसचं मध्य प्रदेशातील सत्तेचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण, दोन जागा असलेल्या बहुजन समाजवादी पक्षाने अगोदरच पाठिंबा जाहीर केला आहे. तर समाजवादी पक्षाचीही एक जागा निवडून आली आहे.

गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला 109 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर रहावं लागणार आहे. कारण, उर्वरित चार अपक्षांनी जरी भाजपला पाठिंबा दिला तरीही बहुमताचा आकडा पूर्ण होत नाही. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस बहुमतापासून फक्त दोन पावलं दूर आहे.

मध्य प्रदेश (230) :

  • काँग्रेस – 114
  • भाजप -109
  • बसपा – 02
  • सपा – 01
  • इतर – 04

काँग्रेसकडून सत्तास्थापनेचा दावा

काँग्रेसने काल रात्रीच राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. सर्वात मोठा पक्ष या नात्याने सत्तास्थापनेची संधी देण्यात यावी, असं काँग्रेसने म्हटलं आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचा सत्तास्थापनेचा मार्ग सुकर आहे, शिवाय छत्तीसगडमध्येही काँग्रेसला स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे काँग्रेसने तीन मोठी राज्य मिळवली आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *