
Operation Sindoor : संसदेत पावसाळी अधिवेशनादरम्यान ऑपरेशन सिंदूरवर विस्तृत चर्चा झाली. विरोधकांनी या मोहिमेविषयी सरकारला अनेक प्रश्न विचारले. तर सरकारनेही विरोधकांच्या सर्व शंकाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. याच गंभीर विषयावर भाषण करताना एका खासदाराने केलेल्या विधानाची सगळीकडे चर्चा होत आहे. पाकिस्तान हा भारताची बोयको झाला आहे. त्यामुळे आता या देशाला घरी परत आणा, असं विधान त्यांनी केलंय.
राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे प्रमुख तथा नागौर मतदारसंघातून खासदार असलेले हनुमान बेनिवाल ऑपरेशन सिंदूर या विषयावर संसदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानचा भारताची पत्नी म्हणून उल्लेख करताच सभागृहात हशा पिकला.
बेनिवाल 28 जुलै रोजी संसदेत बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, भारताने आता पाकिस्तानला नमवले आहे. तुम्ही भारतीय सैन्याने राबवलेल्या या मोहिमेचे नाव ऑपरेशन सिंदूर असे ठेवले आहे. हे नाव ऐकून असं वाटतंय की भारत पाकिस्तानच्या केसांमध्ये सिंदूर लावत आहे, असे भाष्य बेनिवाल यांनी केले.
तसेच पुढे बोलताना हिंदू मान्यतांनुसार एक महिला आपल्या सिंदूरला पती मानते. भारताने आता पाकिस्तानवर सिंदूर लावला आहे. त्यामुळे पाकिस्तान आता भारताची पत्नी बनला आहे. तुम्ही जा आणी पाकिस्तानला घरी घेऊन या, बेनिवाल यांच्या याच विधानानंतर सत्ताधारी आणि विरोधक सर्वजण हसायला लागले.
“एक तो साढ़े दस-ग्यारह बजे (रात को) बोलवा रहे हो आप… अख़बार में तो छपेगा नहीं… सोशल मीडिया से ही काम निकलेगा…”
ऑपरेशन सिंदूर पर बहस के दौरान लोकसभा में बोलते हुए नागौर से सांसद @hanumanbeniwal pic.twitter.com/8GvMrKbVOe
— Umashankar Singh उमाशंकर सिंह (@umashankarsingh) July 29, 2025
दरम्यान, 29 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत एका तासापेक्षा जास्त वेळ ऑपरेशन सिंदूर, भारताची भूमिका यावर भाषण केले. आपल्या या भाषणात त्यांनी काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षांवर सडकून टीका केली. आपल्या भाषणात त्यांनी भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या धोरणांवरही टीका केली. नेहरूंनी केलेल्या चुका आम्ही दुरुस्त केल्या असेही मोदी म्हणाले. संपूर्ण देशाला सैन्याच्या या कारवाईचा अभिमान आहे, पण काँग्रेसबाबत मात्र आम्हाला माहिती अशी बोचरी टीकाही मोदी यांनी यावेळी आपल्या भाषणात केली.