त्याचं नशीबच जोरावर होतं… खोदकाम करताना सापडलं असं काही की मजूर बनला रातोरात श्रीमंत, काय घडलं असेल? विचार तर करून पाहा!
मध्य प्रदेशातील छतरपूर येथील काटिया या छोट्याशा गावात राहणाऱ्या हरगोविंद यादव आणि त्यांची पत्नीचे नशीब अचानक चमकले आहे. या जोडप्याला खोदकाम करताना अचानक आठ हिरे सापडले आहे.

कधी कुणाचे नशीब चमकेल काही सांगता येत नाही. मध्य प्रदेशातील छतरपूर येथील काटिया या छोट्याशा गावात राहणाऱ्या हरगोविंद यादव आणि त्यांची पत्नीचे नशीब अचानक चमकले आहे. हे दोघे कामगार आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ते हिऱ्यांच्या शोधात खाणींमध्ये काम करत आहेत. अशातच आता या जोडप्याला खोदकाम करताना अचानक आठ हिरे सापडले आहे. यातील काही हिरे हे उच्च दर्जाचे आहेत, तर काही कमी दर्जाचे आहेत. यामुळे आता हे दामप्त्य मालामाल बनणार आहे.
पोटाची भूक भागवण्यासाठी हरगोविंद यादव आणि त्यांची पत्नी खाणींमध्ये दिवसरात्र कष्ट करतात. गेल्या पाच वर्षांपासून हे दोघे हिऱ्यांच्या शोधात जमीन खोदत होते. त्यांनी कठोर परिश्रम सुरु ठेवले आणि त्यांना आता संयमाचे फळ मिळाले आहे. त्यांना खोदकाम करताना आठ हिरे सापडले आहेत. यामुळे त्यांच्या कष्टाला अखेर यश आले आहे. ते आता रातोरात श्रीमंत बनले आहेत.
आधी भावाला सापडला होता हिरा
हरगोविंद यादव यांच्या कुटुंबातील व्यक्तीली हिरा सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी हरगोविंदच्या धाकट्या भावाला एक हिरा सापडला होता. त्या हिऱ्याची किंमत सुमारे अडीच ते तीन लाख रुपये होती. मात्र हा हिरा कुठे विकायचा? त्याची किंमत किती असेल याची कुठलीही कल्पना त्याला नव्हती. त्यामुळे त्याने हा हिरा फक्त एक लाख रुपयांना विकला होता. त्यामुळे या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले होते. मात्र आता पुन्हा या कुटुंबाला हिरे मिळाले आहेत, त्यामुळे आता या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
10 ते 12 लाख रुपये मिळण्याची शक्यता
हरगोविंद यादव यांना आता 8 हिरे सापडले आहेत. हे हिरे विकल्यानंतर त्यांची गरिबी दूर होणार आहे. या जोडप्याचे नशीब आता उजळणार आहे. कारण या 8 हिऱ्यांची किंमत 10 ते 12 लाख रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे. या हिऱ्यांची खरी किंमत जाणून घेण्यासाठी त्यांची चाचणी केली जाणार आहे, त्यानंतर गुणवत्ता समोर आल्यानंतर त्यांची खरी किंमत समोर येणार आहे. हिरे सापडल्याने हरगोविंद यादव आणि पवन देवी यादव यांच्या आयुष्यात नवीन पहाट झाली आहे. गेल्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले आहे.
