AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या महीलेविरोधात कारवाई करा; खासदार राहुल शेवाळे यांची केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांकडे मागणी

ट्विट मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी मतप्रदर्शन करणे, हे अतिशय खेदजनक असून मी याचा निषेध करतो. संबधित यंत्रणांना आदेश देऊन हा आक्षेपार्ह मजकूर त्वरित हटवला जावा. तसेच या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन केंद्रीय गृहमंत्रालयाने सदर महीलेविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या महीलेविरोधात कारवाई करा; खासदार राहुल शेवाळे यांची केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांकडे मागणी
vanita kamble
vanita kamble | Updated on: Aug 24, 2022 | 6:37 PM
Share

दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यासाठी जुलमी इंग्रजी राजवटीविरोधात लढलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर(freedom fighter Savarkar) यांच्याविषयी एका महिलेने केलेल्या आक्षेपार्ह ट्विट प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सदर महिलेविरोधात तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना लोकसभा गटनेते, खासदार राहुल शेवाळे(MP Rahul Shewale) यांनी गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी संबधित यंत्रणांना आदेश देऊन हे आक्षेपार्ह ट्विट त्वरित हटवण्याची मागणीही खासदार शेवाळे यांनी केली आहे. गृह राज्यमंत्र्यांची भेट घेऊन सादर केलेल्या निवेदनात खासदार शेवाळे यांनी ही मागणी केली आहे.

आपल्या निवेदनात खासदार शेवाळे यांनी लिहिले आहे की, 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.47 वाजता मोना आंबेगावकर नावाच्या महिलेने @MonaAmbegaokar या ट्विटर हॅण्डल वरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अतिशय गंभीर स्वरूपाचे आक्षेपार्ह ट्विट केले आहे. कोणताही ऐतिहासिक पुरावा किंवा कुठल्याही प्रकारची खात्रीलायक माहिती नसताना देखील अतिशय हीन दर्जाच्या भाषेत या ट्विट मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी मतप्रदर्शन करणे, हे अतिशय खेदजनक असून मी याचा निषेध करतो. संबधित यंत्रणांना आदेश देऊन हा आक्षेपार्ह मजकूर त्वरित हटवला जावा. तसेच या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन केंद्रीय गृहमंत्रालयाने सदर महीलेविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

दलित विद्यार्थ्याच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या छैलासिंग विरोधात कठोर कारवाई करावी

आपल्या माठातून पाणी प्यायल्याच्या शुल्लक कारणावरून एका दलित विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्याची राजस्थान मध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. या मारहाणीमुळे राजस्थानच्या सुराणा गावातील 8 वर्षीय इंद्र कुमार मेघवाल या दलित विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या निष्पाप विद्यार्थ्याच्या मृत्यूला जबाबदार असणारा सरस्वती विद्यालयाचा संस्थापक छैलसिंग याला राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून छैलासिंग आणि या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील या भेटीदरम्यान खासदार शेवाळे यांनी गृह राज्यमंत्र्यांना केली. तसेच, या प्रकरणात सदर विद्यार्थ्याच्या कुटुंबाकडून केल्या जाणाऱ्या मागण्यांविषयी सकारात्मक विचार करण्याची विनंती खासदार शेवाळे यांनी केली आहे. याविषयी लेखी निवेदन देऊन या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली.

Follow Us
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष