MPL : भोपाळ आणि जबलपुर दरम्यानच्या सामन्यावर पावसाने पाणी फेरले, दोन्ही टीमला प्रत्येकी एक पॉईंट
दीड तासांहून अधिक वाट पाहिल्यानंतर, जेव्हा पावसाने सामना पुन्हा सुरू होऊ दिला नाही, तेव्हा सामना अधिकाऱ्यांनी तो रद्द करण्याचा निर्णय घेतला.

मध्य प्रदेश प्रीमियर लीगच्या दूसऱ्या क्रिकेट सामन्यावर पावसाने पाणी फेरले आहे. श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियम येथे जबलपुर रॉयल लायन्स आणि भोपाळ लेपर्ड्स यांच्या दरम्यान गुरुवारी या टुर्नामेंटचा दुसरा सिझन सुरु झाला आहे. या सिझनचा हा दुसराच सामना होता. या मॅच दरम्यान पावसाचे पाणी फेरल्याने दोन्ही संघांना प्रत्येक एक-एक पॉईंट मिळाला आहे. जबलपूर संघाने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी स्विकारण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा हा निर्णय योग्य असल्याचे यावेळी सिद्ध झाल्याचे दिसत होते…पावसाने पाणी फेरले..

Image Courtesy: ©️ Adimazes/MPLeagueT20
भोपाळ संघाने आधी फलंदाजी करताना पॉवरप्ले दरम्यान त्यांच्याच तीन विकेट गमावल्या होत्या आणि स्कोअर बोर्ड एकूण रन ५५ झाले होते. इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपल्या बॅटचा जोर दाखवून MPLचा दूसरा सिझन खेळणाऱ्या अनिकेत वर्मा याची सुरुवातच खराब झाली.त्याने एक सिक्सर मारल्यानंतर एक विकेट गमावली. गेल्या हंगामात अनिकेत याने याच लीगमध्ये सर्वाधिक रन बनवले होते आणि सर्वाधिक सिक्स देखील ठोकून काढले होते.
वाट पाहिल्यानंतरही पाऊस थांबेना..मग ड्रॉ
केवळ ९० च्या स्कोअरवर भोपाळ संघाने त्यांच्या पाच विकेट गमावल्या. परंतू खालच्या क्रमावर आलेल्या माधव तिवारीने मोर्चा उघडला. माधव देखील एमपीएलमध्ये सहभाग घेतल्यानंतर आयपीएल दिल्ली कॅपिटल्सचा एक हिस्सा बनले होते आणि त्यांचे कौतूक देखील झाले होते. माधव याने २० चेंडुत नाबाद ३१ धावा कुठून काढल्या. १६ ओव्हरनंतर भोपाळने सहा विकेटच्या नुकसानानंतर १३० रन बनावले होते. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि मॅच थांबवावी लागली. दीड तासांहून अधिकची वाट पाहिल्यानंतर पाऊस थांबेना. त्यानंतर अखेर मॅच ड्रॉ करण्यात आली दोघांना प्रत्येक एक-एक गुण वाटण्यात आले.